‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये विविध पदांसाठी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक ऑफ महाराष्ट्रने स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदासाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 असेल. अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2019 पासून सुरु होईल.

वयोमर्यादा –
या पदांसाठी अर्ज करण्याचे वय जास्तीत जास्त 25 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. यासंंबंधित आधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन सविस्तर वाचावे लागेल.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची प्रारंभाची तारीख – 16 डिसेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 डिसेंबर 2019
परिक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 31 डिसेंबर 2019

पदांचे वितरण –
नेटवर्क अ‍ॅण्ड सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन- 11
डाटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – 04
सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – 14 सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – 07
प्रोडक्शन सपोर्ट इंजिनियर- 07
ई-मेल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर- 02
बिजनेस अ‍ॅनालिस्ट- 05
एकूण पदसंख्या – 50

अर्ज प्रक्रिया –
इच्छुक उमेदवार संबंधित माहिती अधिकृत वेबसाइट https://www.bankofmaharashtra.in/ वरुन घेऊ शकतात. यानुसार अर्ज करण्याची तारीख 16 डिसेंबर आहे, तर 31 डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.

निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत यांच्या आधारे होईल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/