Indian Army Recruitment 2021 : भारतीय लष्करात बना अधिकारी, आजच करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय लष्कराने आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) च्या पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, भारतीय लष्कराने अधिकृत वेबसाईट joinindianarmy.gov.in वर नोटिफिकेशन जारी केले आहे. या प्रक्रियेत 37 रिक्त पदांची भरती केली जाणार आहेत.

भारतीय लष्करात अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवाराने 18 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.

महत्ताच्या तारखा

– अर्ज करण्याची तारीख – 19 एप्रिल, 2021

– अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे, 2021

पदाचे नाव

– एसएससी अधिकारी (सेना डेंटल कोर) – 37

वयोमर्यादा काय ?

31 डिसेंबर, 2021 पर्यंत उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे

काय आहे पात्रता ?

– उमेदवार BDS असणे गरजेचे आहे. तसेच 31 मार्च, 2021 पर्यंत डीसीआयच्या माध्यमातून एक वर्षाचा रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण करणे गरजेचे आहे.

– उमेदवाराकडे डेंटल काउन्सिल, डीसीआयचा स्थायी डेंटल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे गरजेचे.

– 16 डिसेंबर, 2020 ला राष्ट्रीय परीक्षा बोर्डच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा दिलेली असावी. तसेच ज्या उमेदवारांनी फक्त NEET (MDS) – 2021 अर्ज भरताना AD Corps पर्यायात SSC साठी YES वर टिक केला आहे. तेही अर्ज करू शकतात.