UPSC CAPF AC Recruitment 2021 : BSF, CRPF, SSB, ITBP आणि CISF मध्ये निघाली भरती, येथे करा थेट अर्ज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – युपीएसएसीने सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दलात (एसएसबी) अनेक पदांवर भरती काढली आहे. या अंतर्गत असिस्टंट कमांडंटच्या 159 पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021 अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर अर्ज करू शकतात.

पदांची माहिती
* केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) – 67 पदे
* केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) – 36 पदे
* सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) – 35 पदे
* भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) – 20 पदे
* सशस्त्र सीमा दल (एसएसबी) – 1 पद
* एकुण पदे – 159

महत्वाच्या तारखा…
* अर्जाची सुरुपरत : 15 एप्रिल 2021
* ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 5 मे 2021
* बँकेच्या माध्यमातून अर्ज शुल्क जमा करण्याची अखेरची तारीख : 4 मे 2021
* ऑनलाईन अर्ज शुल्क जमा करण्याची अखेरची तारीख : 5 मे 2021
* लेखी परीक्षेची तारीख (सीपीएफ एसी 2021 परीक्षा) : 08 ऑगस्ट 2021

पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ग्रॅज्यूएट असणे अनिवार्य आहे. यासाठी 20 ते 25 वर्षादरम्यानचे उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क
* सामान्य/ओबीसी वर्गासाठी – 200 रुपये
* एससी, एसटी आणि महिला वर्गाच्या उमेदवारांना शुल्क नाही

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक पात्रता परीक्षा, मेडिकल टेस्ट, शारीरिक मानक परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.

* अधिकृत नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.
https://www.upsc.gov.in/sites/default/files/Notif-CAPFACs-Exam-2021-Engl-150421.pdf
* ऑनलाईन अर्ज (पार्ट-।) साठी येते क्लिक करा.
https://upsconline.nic.in/mainmenu2.php
* ऑनलाईन अर्ज (पार्ट-॥) साठी येथे क्लिक करा.
https://upsconline.nic.in/upload1.php?ex=CPF
* अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.
https://www.upsc.gov.in/