Sassoon Dean Dr. Vinayak Kale | ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे (Lalit Patil Drug Case) गाजत असलेल्या ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे (Sassoon Dean Dr. Vinayak Kale) यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने (Medical Education Department) बुधवारी रात्री उशिरा याबाबतचा आदेश काढला. मॅट आणि उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानंतर आता शासनाने ही पुर्ननियुक्ती (Sassoon Dean Dr. Vinayak Kale) केली आहे.

राज्य शासनाने या वर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर (Maharashtra Mental Health Institution) केली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur)
यांची नियुक्ती केली होती. राजकीय वजन वापरुन डॉ. ठाकूर यांनी ही नियुक्ती मिळविली होती.
त्याविरोधात डॉ. काळे हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण Maharashtra Administrative Tribunal (मॅट) मध्ये
गेले होते. मॅटने सहा महिन्यानंतर जुलैमध्ये काळे यांच्या बाजूने निर्णय दिला.
त्यानंतर डॉ. ठाकूर यांनी मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
डॉ. ठाकूर यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता.
त्याचदरम्यान ललित पाटील ड्रग्ज प्रकरण समोर आले़ ससून रुग्णालयातील ललित पाटील याचा मुक्काम वाढविण्यासाठी
डॉ. संजीव ठाकूर यांचा हात असल्याचे आरोप केले जात होते. त्याबाबत शासनाच्या समितीने केलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर यांना दोषी ठरवून त्यांना पदमुक्त केले होते. तरीही वैद्यकीय शिक्षण विभाग डॉ. काळे यांची नियुक्ती (Sassoon Dean Dr. Vinayak Kale) करत नव्हते. शेवटी बुधवारी रात्री उशिरा आदेश काढला. डॉ. काळे हे गुरुवारी ससून अधिष्ठाता पदाची सुत्रे हाती घेतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Mumbai-Pune Highway | मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताय? मग जाणून घ्या ३ तासांच्या ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्ग
ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना महापालिकेचा लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात