Satara ACB Trap | दोन लाखांच्या लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara ACB Trap | मुलाला गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा पोलीस दलाच्या भुईंज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या कारवाईमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Satara ACB Trap)

पोलीस उपनिरीक्षक निवास शंकर मोरे (वय 55, रा. यादव कॉलनी, प्लॅट नं. 25 तामजाईनगर, सातारा), खासगी इसम संजय प्रभू माटे (रा. भुईंज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सातारा एसीबीच्या पथकाने (Satara ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.30 नोव्हेंबर) केली. याबाबत 43 वर्षीय महिलेने तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या मुलावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मुलाला आरोपी न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सातारा एसीबीकडे तक्रार केली. (Satara ACB Trap)

सातारा युनिटने मंगळवारी (दि.29 नोव्हेंबर) पडताळणी केली असता, मोरे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या
मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी
करून तडजोडीअंती 25 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम खासगी इसम संजय माटे याच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने बुधवारी (दि.30 नोव्हेंबर) सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये घेताना माटे याला रंगेहात पकडले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सूरज घाटगे, सातारा एसीबीचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार,
पोलीस अंमलदार प्रशांत ताटे, विशाल खरात, शीतल सपकाळ यांच्या पथकाने केली.

Web Title :- Satara ACB Trap | Two people, including a police sub-inspector, are in the net of anti-corruption pune in a bribery case of two lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kriti Sanon | क्रिती सेनॉनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; केला मोठा खुलासा

Pune Police | सर, हम कामकाज देखें क्या? पुण्यातील नवनियुक्त उपायुक्त म्हणाले – ‘दुबारा इधर मत दिखना, छोडूंगा नही’, जाणून घ्या प्रकरण

Ravrambha | ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित ! ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका