Satara News | साताऱ्यात बाजार समितीच्या भूमीपूजनावरून राडा; दोन्ही राजे आमने-सामने

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara News | अनेक किरकोळ कारणांवरून साताऱ्यातील (Satara News) दोन्ही राजे आमने सामने आल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. साताऱ्यातील शिवराज ढाब्याजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bazar Samiti) नवीन आवारात झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे बुधवारी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) आमने-सामने आले. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन उधळून लावले. मात्र, उदयनराजेंच्या विरोधाला न जुमानता शिवेंद्रराजे भोसले यांनी भूमिपूजन केले. यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे साताऱ्यात पुन्हा दोन राजेंमधला वाद पेटला आहे. (Agricultural Produce Market Committee)

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजन होणार होते. मात्र 9 वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी पोहोचले, आणि तिथे असलेले साहित्य फेकून दिले. त्याचबरोबर एक कंटेनरही जेसीबीने नष्ट केला. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोर भूमीपूजन केले. (Satara News)

“माझ्या जागेत भूमिपूजन करायचे नाही,” असे म्हणत खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना झापले. वाद सुरू असतानाच दुसरीकडे आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजे समोर भूमिपूजन केले. त्यानंतर काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी (Satara Police) मध्यस्ती करत परिस्थिती आटोक्यात आणली.

Web Title : Satara News | udayanraje and shivendraraje clashed over bhoomipujan of the market committee satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा