Satarcha Salman | ‘सातारचा सलमान’ ‘या’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; सिनेमात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार

पोलीसनामा ऑनलाईन : Satarcha Salman | हिरो बनण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. तर काहींचे स्वप्न सत्यात उतरते तर काहींचे हे स्वप्न स्वप्नच राहते. आता याच विषयावर आधारित ‘साताऱ्याचा सलमान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. स्वप्न बघितलं तर पूर्ण होतात अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Satarcha Salman)

एकंदरीत साताऱ्याचा सलमान या सिनेमाच्या ट्रेलरवरून हे लक्षात येते की साताऱ्यात राहणार एक साधा मुलगा त्याला हिरो बनायचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कडाडीची मेहनत घेत असतो. तर या खडतर प्रवासात त्याचे कुटुंबीय आणि मित्रही त्याला खूप मदत करत असतात आणि या प्रवासात आलेले चढ-उतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेल्या परिस्थितीला तो कशा पद्धतीने सामोरे जाणार हे सगळं काही आपल्याला हा सिनेमा पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर जोरात व्हायरल होताना दिसत आहे.

हेमंत ढोमे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा उचलली आहे. या सिनेमात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचीही झलक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. (Satarcha Salman)

या चित्रपटाबाबत बोलताना हेमंत ढोमे म्हणाले, “प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मोठे व्हायचे स्वप्न पाहत असतो
आणि या प्रवासात अडचणी हे येतातच. कधी अशी वेळ येते की आपलं सगळं संपलं असं आपल्याला वाटतं.
मात्र आपण वाईटातूनही काही चांगलं बघितलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेले पाहिजे.
आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूपच गरजेचे आहे.
आपण केवळ आपले काम करत राहावे त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं.
ही ऊर्जा देणारी भावना मनात नेहमीच पाहिजे हाच संदेश या सिनेमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
हा सिनेमा तुमचे नक्कीच मनोरंजन करेल तसेच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल हे मात्र नक्की.”

Web Title :- Satarcha Salman | satarcha salman marathi movie trailer released know movie release date- starcast