Satyajeet Tambe | ‘राज्य सरकारनेही क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा’; आमदार सत्यजीत तांबेची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Satyajeet Tambe | महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati Sports Award) व क्रीडा प्रकारांमध्ये योगासनाचा (Yoga as Sports) समावेश करण्यात यावा. केंद्राप्रमाणे (Center Government) राज्य सरकारने देखील क्रीडा प्रकारामध्ये योगासनाचा समावेश करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी विधान परिषदेत (Legislative Council) केली. या मागणीनंतर सरकार सकारात्मक असून लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansode) यांनी उत्तर देताना दिली.

यावेळी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले की, शिक्षण क्षेत्र, नोकरी, पुरस्कार, किंवा राज्य शासनाच्या
बाबतीत हे सगळे लाभ योगासन खेळाडूंना मिळाले पाहिजे. योगासन या क्रीडा प्रकाराचा 2020 मध्ये केंद्राने राष्ट्रीय खेळांमध्ये समावेश केला आहे. 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला 140 पदक मिळाले. त्यात 16 पदके हे योगासनांमध्ये मिळाले, त्यामुळे सरकारने या पुरस्कारांमध्ये योगासनाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले, याबाबत तपासू आणि निर्णय घेऊ.
मात्र, योगासनाचा अंतर्भाव करायलाच पाहिजे असा वरुन निर्णय आहे.
त्यामुळे तपासण्याची गरज नाही, योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय घ्या,
असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांनी पिठासनावरुन दिले.
केंद्राने योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश केला तर राज्य सरकार ही योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करेल
व लवकरच याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री बनसोडे यांनी सांगितले.

Health Crisis In Pune: Alarming Conjunctivitis Outbreak Hits Alandi, 1560 Cases Reported in 4 Days

Maharashtra Monsoon Session | ‘…म्हणून विरोधी पक्षनेता निवडीला विलंब’, भाजपचा काँग्रेसवर निशाणा (व्हिडिओ)