Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सौम्याने ‘भाभीजी घरपर है’ या विनोदी मालिकेतून अनिता भाभी आणि गोरी मेम बनून प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. आज सौम्याला वेगळ्या अशा ओळखीची काहीच गरज नाही. सौम्याला (Saumya Tandon) आज घराघरात ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाने सर्वांनाच आपलेसे केले आहे.

सौम्या ही मूळची मध्य प्रदेश भोपाळची आहे. एका मुलाखतीत सौम्याने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. पुढे बोलताना सौम्या म्हणाली की, “मी एकदा रात्री माझ्या घरी परतत होते यावेळी एका मुलाने माझी गाडी अडवली आणि माझ्या भांगेत सिंदूर भरलं. या घटनेने मी खूपच घाबरले होते. तर अशीच एक दुसरी घटना मी शाळेत असताना घडली आहे. मी शाळेत असताना सायकल वरून घरी येत होते, तर एका मुलाने मला ओव्हरटेक केलं आणि रस्त्यावर पाडले. त्यावेळी माझ्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तेव्हा मी रस्त्यावरच तळमळत होते. मदतीसाठी ओरडत होते. मात्र कोणीही मला मदत केली नव्हती. या दोन घटना आजीवन मी कधीच विसरू शकणार नाही”. या खुलासाने सर्वांनाच धक्का बसला आहे. (Saumya Tandon)

सौम्याने आजवर आपल्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. काही दिवसांपूर्वीच सौम्याने ‘भाभीजी घरपर है’ ही मालिका सोडली आहे. अभिनेत्री जरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सौम्याने आजवर अनेक टीव्ही शो केले. त्याचबरोबर शाहिद कपूर आणि करीना कपूर सोबत ‘जब वी मेट’ या चित्रपटातदेखील तिने काम केले आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी ‘भाभीजी घरपर है’ या मालिकेतूनच मिळाली होती.

Web Title :-Saumya Tandon | bhabhiji ghar par hain fame saumya tandon share shocking incident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून