NPS : आता Aadhaar e-KYC च्या द्वारे ऑनलाइन उघडा एनपीएस अकाऊंट, ‘ही’ आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पीएफआरडीए ग्राहकांना एक अशी सुविधा देते, ज्याद्वारे ऑनलाइन आधार ई-केवायसीचा वापर करून नॅशनल पेंशन सिस्टम (एनपीएस) खाते उघडणे सोपे होते. एनएसडीएल-सीआरएने आपल्या ई-एनपीएस प्लॅटफॉर्मवर ग्राहक नोंदणीसाठी आधार बेस्ड ऑनलाइन ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रियेला सक्षम बनवले आहे. ई-एनपीएस पीएफआरडीएद्वारे नियुक्त सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सीज (सीआरए) चा एक ऑनलाइन एनपीएस ऑन-बोर्डिंग प्लॅटफॉर्म आहे. येथे कुणीही एनपीएसमध्ये नोंदणी करू शकतो आणि ऑनलाइन योगदान देऊ शकतो.

सध्याचे सबस्क्रायबर या प्लॅटफॉर्मवर आपले टियर-2 खाते अ‍ॅक्टिव्ह करू शकतात. यापूर्वी ई-एनपीएस अंतर्गत नोंदणी आधार ऑफलाइन ई-केवायसी किंवा व्यक्तीच्या पॅन आणि बँक खात्याद्वारे होते. परंतु आता आधार बेस्ड ऑनलाइन ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रियेने एनपीएस खाते उघडणे सोपे झाले आहे. याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेवूयात…

ही आहे प्रोसेस
स्टेप 1. ई-एनपीएस पोर्टल (https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html) वर जा.
स्टेप 2. आता National Pension System आणि यानंतर Registration पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3. आता New Registration मध्ये खात्याचा प्रकार निवडा. नंतर भारतीय नागरिक, एआरआय किंवा ओसीआयपैकी एक पर्याय निवडा.
स्टेप 4. आता Register With पैकी Aadhaar Online/Offline KYC पर्यायाची निवड करा. आता यानंतर Tier types पैकी Tier I only पर्यायाची निवड करा.
स्टेप 5. आता 12 अंकाचा आधार किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी नोंदवा आणि नंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा.
स्टेप 6. आता प्राप्त झालेला ओटीपी नोंदवा.
स्टेप 7. यशस्वी पडताळणीनंतर तुमची माहिती जसे की, नाव, लिंग, जन्म तारीख, पत्ता, फोटो, आधारकार्ड रेकॉर्डमधून घेतले जाईल.
स्टेप 8. आता एनपीएस नोंदणी प्रोसेससाठी दुसरी मागितलेली माहिती नोंदवा.
स्टेप 9. आता पहिले एनपीएस योगदान द्यावे लागेल आणि ओटीपी नोंदवावा लागेल. यासोबतच तुमचे एनपीएस खाते उघडले जाईल.