SBI देतेय ग्राहकांना दरमहा 10000 रुपये कमावण्याची संधी, ‘या’ बेस्ट सेव्हिंग स्कीमचा घ्या लाभ

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) सुरक्षित पर्यांयापैकी एक आहे. एसबीआय आपल्या ग्रहाकांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) पासून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) पर्यंत सेव्हिंगचे ऑपशन देत आहे. बँकेच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही प्रत्येक महिन्याला 10000 रुपयांपर्यंत रक्कम मिळवू शकता. या सेव्हिंग स्कीम्सबाबत जाणून घेवूयात…

एसबीआयची एन्युटी स्कीम
एसबीआयच्या स्कीममध्ये 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांच्या अवधीसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. यामध्ये गुंतवणूक केल्यास व्याजदर तोच असेल, जो ठरवलेल्या कालावधीसाठी टर्म डिपॉझिटसाठी असेल. समजा जर तुम्ही पाच वर्षासाठी फंड डिपॉझिट केला, तुम्हाला पाच वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर लागू होणार्‍या व्याजदराच्या हिशेबानेच व्याज मिळेल. या स्कीमचा फायदा सर्व लोक घेऊ शकतात.

अशाप्रकारे होईल प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये उत्पन्न
जर एखाद्या गुंतवणुकदाराला दर महिन्याला 10,000 रुपये मासिक उत्पन्न हवे असेल, तर त्यास 5,07,964 रुपये जमा करावे लागतील. जमा केलेल्या रक्कमेवर, त्यास 7 टक्केच्या व्याजदराने रिटर्न मिळेल, जो दर महिन्याला सुमारे 10,000 रुपये आहे. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 5 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला भविष्यात आपले उत्पन्न वाढवायचे असेल तर हा तुम्हाला चांगला पर्याय आहे.

एसबीआयच्या एन्युटी स्कीममध्ये किमान 1000 रुपये मासिक एन्युटीसाठी जमा करता येऊ शकते. यामध्ये कामल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा ठरलेली नाही. एन्युटी पेमेंटमध्ये ग्राहकाकडून जमा रक्कमेवर निश्चित काळानंतर व्याज मिळण्यास सुरूवात होते. या योजना भविष्यासाठी खुप चांगल्या आहेत.

रिकरिंग डिपॉझिट (आरडी) स्कीम
सामान्यपणे मध्यम वर्गातील लोकांनी आरडीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित केले पाहिजे. आरडीमध्ये छोट्या बचतीद्वारे दर महिन्याला ठरवलेली रक्कम जमा केली जाते आणि मॅच्युरिटीवर एक ठरावी रक्कम व्याजासह मिळते. रिकरिंग डिपॉझिट सामान्य लोकांकडून पसंती मिळते.