SBI मध्ये FD करणार्‍यांसाठी मोठी बातमी ! उद्यापासुन व्याजदर बदलणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्थ – जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD ) ठेवले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण बँकेने मुदत ठेव योजनेचे (FD ) व्याजदर बदलले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10 सप्टेंबरपासून सर्व मुदतीच्या ठेवींवरील व्याज दर 0.20 ते 0.25 टक्क्यांपर्यंत घटवण्यात येतील. तसेच बल्क टर्म ठेवींवरील व्याजदर 0.10 टक्क्यांवरून 0.20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आले आहेत. एसबीआयने सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा एफडीचे दर बदलले आहेत. यामुळे लाखो ग्राहकांचे नुकसान होणार आहे. एसबीआयच्या या नवीन नियमांनंतर देशातील अन्य बँकाही व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे.

एसबीआय एफडीच्या नवीन व्याजदराबद्दल जाणून घ्या ….

1) 7 ते 45 दिवसांची FD-
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता 7 ते 45 दिवसांच्या FD वर नवीन व्याजदर 4.5 टक्के असेल.

2) 46 ते 179 दिवसांची FD –
आता 46 ते 179 दिवसांच्या एफडीला 5.50 टक्के व्याज मिळेल.

3) 180 ते 210 दिवसांची FD –
आता 180 ते 210 दिवसांच्या FD वर एसबीआई ने 0.20 टक्के व्याज दर घटवले आहेत. बँक 180 ते 210 दिवसांच्या FD वर 6 टक्के व्याज देत होते. 10 सप्टेंबरपासून हा व्याज दर 5.80 टक्क्यांवर येईल.

4) 211 दिवस ते 1 वर्षांपर्यतची FD –
एसबीआयने 211 दिवसांपासून 1 वर्षापर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात 0.20 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.

5) 1 ते 2 वर्ष मुदतीची FD –
एसबीआय आता 1-2 वर्षाच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज देणार आहे.

6) 2 ते 3 वर्ष मुदतीची FD –
2 ते 3 वर्षाच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज देणार आहे.

7) 3 ते 5 वर्ष मुदतीची FD –
3 ते 5 वर्ष मुदतीच्या FD वर 6.25 टक्के व्याजदर मिळेल.

8) 5 ते 10 वर्ष मुदतीची FD –
5 ते 10 वर्ष मुदतीच्या FD वर 6.25 टक्के व्याजदर मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –