SBI Gold Loan : गरजेच्या वेळी एसबीआयकडून घ्या सोने तारण कर्ज; जाणून घ्या संपूर्ण तपशील, होईल फायदा

पोलीसनामा ऑनलाईन : बऱ्याच वेळा आपल्याला अचानक पैशांची गरज भासते आणि नेमके अश्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात. अशा परिस्थितीत आपल्याला कोणाकडून उधार मागण्याची किंवा अस्वस्थ होण्याची गरज नाही. घरात असलेले सोने तुमची समस्या दूर करेल. आजकाल अनेक बँका गोल्ड लोन योजना चालवित आहेत. जिथे सोने गहाण ठेवून पैसे मिळतात. त्याच वेळी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी बँक कर्जासाठी उत्तम ऑफर आणली आहे. कमी व्याज दरावर येथे सोने कर्ज उपलब्ध आहे. जाणून घेऊया या एसबीआय गोल्ड लोन योजनेबद्दल….

व्यापाऱ्यांसाठी विशेष सुविधा तर बँकेच्या ग्राहकांना 50 लाखांपर्यंत कर्ज
एसबीआय व्यापाऱ्यांना सोन्याच्या कर्जावर विशेष ऑफर देते. या ऑफर अंतर्गत 1 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज घेता येईल. जरी त्याचे वार्षिक व्याज 7.25 टक्के आहे. यात व्यावसायिकाला त्याची बॅलेन्सशीट दाखविण्याची गरज नाही. त्याचवेळी स्टेट बँकेच्या ग्राहकांना 20 हजार ते 50 लाखांपर्यंत सोन्याचे कर्ज मिळते. यासाठी 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे असणे आवश्यक आहे. विशेष गोष्ट अशी की, कर्जासाठी कोणतेही इनकम प्रूफ दाखविण्याची गरज नाही. एसबीआय सोन्याच्या किंमतीच्या 75 टक्के पर्यंत कर्ज देते. कोणतीही व्यक्ती एकट्याने किंवा संयुक्तपणे कर्ज घेऊ शकते. त्याचे वार्षिक व्याज 7.50% आहे आणि बँक कोणतेही प्रक्रिया शुल्क घेत नाही.

मिस कॉलवर मिळणार सुवर्ण कर्ज
ग्राहक स्टेट बँकेच्या सुवर्ण कर्जासाठी 7208933143 वर एक मिस कॉल किंवा 7208933145 वर एसएमएस करू शकतात. बँक स्वतः परत कॉल करेल आणि कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू करेल. त्याचबरोबर ग्राहक जवळच्या शाखेत जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकतात.