SBI ने YONO App मध्ये अॅड केले हे खास फीचर, log in च्या शिवाय असे होईल बिलाचे पेमेंट
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या कस्टमरसाठी नवनवीन सुविधा आणत असते. आता स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांच्या रोजच्या गरजांसाठी बिल पेमेंट करण्यासाठी योनो अॅपमध्ये नवीन फीचर अॅड केले आहे. या फीचरच्या मदतीने आता तुम्ही लॉग इन न करताच खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासोबतच सर्वप्रकारच्या बिलांचे पेमेंट सहजपणे करू शकता. योनो अॅपच्या या नव्या फीचरबाबत जाणून घेवूयात…
योनो अॅपद्वारे सर्व ट्रांजक्शन शक्य!
एसबीआयच्या योनो अॅपचे पूर्ण नाव ’यू ओन्ली नीड वन अॅप’ आहे. एसबीआयचा हे अॅप सुरू करण्याचा हाच हेतू होता की, ग्राहकांना एकाच अॅपच्या मदतीने सर्व प्रकारचे ट्रांजक्शन करता येईल. योनो अॅपच्या मदतीने एसबीआय कस्टमर बँकिंग व्यवहारांशिवाय चित्रपटाचे तिकिट बुकिंग करू शकतात, शॉपिंग करू शकतात, खाण्या-पिण्याच्या बिलासह इतर पेमेंट करू शतात.
लॉग इन न करता असे करा ट्रांजक्शन
एसबीआयच्या योनो अॅपमध्ये प्री लॉग इन फीचर्स देण्यात आले आहे. या फीचर्सच्या मदतीमुळे तुम्हाला वारंवार लॉग इन करण्याची आवश्यकता भासणार नाही. या फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला केवळ 6 अंकांचा एमपिन जनरेट करावा लागेल. शिवाय प्री लॉग इन फीचरचा वापर तुम्ही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन, फेस आयडेंटिफिकेशन किंवा यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने सुद्धा करू शकता.
इतर बँकाही देतात ही सुविधा
अशाप्रकारची सुविधा देणारी केवळ एसबीआयच नसून अनेक प्रायव्हेट आणि सरकारी बँकासुद्धा ही सुविधा ग्राहकांना देत आहेत. ज्यांच्या माहितीसाठी तुम्हाला बँकेशी संपर्क करावा लागेल.