घर खरेदी करणार्‍यांसाठी चांगली बातमी, मार्चपर्यंत विना प्रोसेसिंग फीस 6.8 % दरानं मिळेल SBI चं होम लोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षात तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून तुम्हाला मोठी संधी दिली जात आहे. त्यानुसार, चांगला फायदा होणार आहे. पण SBI च्या या संधीचा फायदा फक्त घर खरेदी करणाऱ्यांना होणार आहे.

भारतीय स्टेट बँकेने (SBI) 6.8 टक्क्यांच्या सुरुवातीच्या व्याजावर नव्या ग्राहकांना गृह कर्जावर ऑफर देत आहे. तसेच कमी दरात SBI कडून गृहकर्ज देण्याची संधी दिली आहे. 6.8 टक्क्यांच्या सुरुवातीला व्याजदरावर नव्या ग्राहकांना गृहकर्जावर ऑफर दिली जात आहे.

मिस्ड कॉल द्या अन् माहिती करून घ्या…
SBI ने सांगितले, मार्च 2021 पर्यंत कोणत्याही प्रोसेसिंग फीच्या 6.8 टक्क्यांची सुरुवातीच्या दरात कर्ज घेऊ शकता. त्यासाठी बँकेने 7208933140 हा नंबर जारी केला आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन गृह कर्जासंबंधी पूर्ण माहिती घेता येऊ शकेल.

गृहकर्ज व्यवसाय 5 लाख कोटी पार
SBI ने आणखी एक रेकॉर्ड बनविले आहे. SBI ने सांगितले, की गृहकर्जाच्या व्यवसायाने 5 लाख कोटींचा आकडा पार केला आहे.

5 पटींनी वाढला गृहकर्ज व्यवसाय
बँकेने सांगितले, की 10 वर्षांत SBI च्या रिअर इस्टेट अँड हाऊसिंग बिजनेस 5 टक्क्यांनी वाढला आहे. 2011 मध्ये बिजनेस 89,000 कोटी रुपये होता. आता 2021 मध्ये 5 लाख कोटी पर्यंत पोहोचला आहे. तसेच 2024 या आर्थिक वर्षात हा आकडा 7 लाख कोटींपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.