SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जर तुम्ही सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर वेळीच अलर्ट व्हा, कारण 1 जुलैपासून देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या नियमात बदल (sbi new rule) होणार आहेत. स्टेट बँककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नवीन नियम लागू झाल्यानंतर ATM मधून पैसे काढणे (Cash Withdrawal) आणि चेकबुक (Cheque Book) चा वापर करणे महाग ठरू शकते. sbi new rule withdrawing money from atm will be expensive from 1 july these rules will also change

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

बँकेने सर्व्हिस चार्जमध्ये केला बदल

स्टेट बँक इंडियाने आपल्या एटीएम आणि बँकेच्या ब्रँचमधून पैसे काढण्याच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल केले आहेत. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार नवीन चेकबुक (Chequebook), ट्रान्सफर आणि अन्य नॉन-फायनान्शियल व्यवहारांवर लागू केले जातील. नवीन सर्व्हिस चार्ज 1 जुलै, 2021 ते SBI एसबीआय बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खाताधारकांना लागू होती.

जाणून घ्या काय आहे BSBD खाते

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बीएसबीडी बँक खाते हे झीरो बॅलन्स बचत खाते असते.
झीरो बॅलन्स खाते गरीब कुटुंबांसाठी उघडले जाते.
स्टेट बँक ऑफ इंडिया झीरो बॅलन्स खात्यांवर रेग्युलर सेव्हिंग्ज खात्याप्रमाणेच व्याज दिले जाते.

स्टेट बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये हे आहेत बदल

SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शियल वर्षात 10 चेकची कॉपी दिली जाते.
आता 10 चेकच्या चेकबुकवर ग्राहकांना शुल्क द्यावे लागेल.
आता BSBD बँक खातेधारकांना 10 चेक लीवसाठी 40 रुपयांसह GST चार्ज द्यावा लागेल, तर 25 चेक लीवसाठी 75 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल.
इमर्जन्सी चेकबुकच्या 10 लीव साठी 50 रुपये प्लस जीएसटी द्यावा लागेल.
मात्र, बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी चेकबुकवर नवीन सर्व्हिसमधून सूट दिली आहे.

एटीएममधून कॅश काढणे झाले महाग

एसबीआय BSBD खातेेधारकांना चारवेळा फ्री कॅश काढण्याची सुविधा देते.
हे लिमिट संपल्यानंतर बँक ग्राहकांकडून चार्ज वसूल करते.
ATM मधून रोकड काढल्यास बँक 15 रुपयांसह जीएसटी चार्ज सुद्धा वसूल करते.

याशिवाय कोरोना संकटात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांना दिलासा देण्यासाठी कॅश काढण्याची मर्यादा वाढवली आहे.
ग्राहक आपल्या बचत खात्यातून दुसर्‍या ब्रँचमध्ये जाऊन विड्रॉल फॉर्मद्वारे 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता आणि चेकने दुसर्‍या ब्रँचमधून 1 लाख रुपयांपर्यंत काढता येऊ शकतात.

Web Title :  sbi new rule withdrawing money from atm will be expensive from 1 july these rules will also change

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते