ऑनलाईन पेमेंट करताना सायबर हल्ल्यापासून वाचायचंय ? तर ‘या’ 5 गोष्टी घ्या जाणून, पैसे राहतील सुरक्षित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे डिजिटल व्यवहारामुळे फायदा झाला. लॉकडाऊनदरम्यान ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली. लोकांनी सामान खरेदी करणे, बिलांचे पेमेंट करणे यासाठीही ऑनलाईन माध्यम निवडले होते. या वाढत्या व्यवहारांमुळे सायबल हल्ल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगली नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. अशा काही टिप्स् आहेत, त्याचा वापर केल्यास सायबर हल्ल्यापासून वाचता येऊ शकते.

सार्वजनिक WiFi चा वापर टाळा
रेस्टॉरंट, हॉटेल, रेल्वे स्टेशन, ऑफिस, विमानतळापासून रुग्णालयापर्यंत या सर्वच ठिकाणी WiFi ची सुविधा मिळते. मोबाईल नेटवर्कच्या खराब सिग्नलमुळे अनेक लोक स्पीडी इंटरनेटच्या हव्यासापोटी WiFi चा वापर करतात. मात्र, अशा सार्वजनिक नेटवर्कवर सुरक्षा कमी असते. हॅकर्ससाठी हे हॅक करणे सोप असते. त्यामुळे शक्य असल्यास प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करावा.

पासवर्ड ठेवा स्ट्राँग, OTP चा करा वापर
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मल्टिपल स्ट्राँग पासवर्ड ठेवावा. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी 3D पिन किंवा पासवर्डऐवजी OTP चा पर्याय निवडा. OTP हा अधिकृत नंबरवर पाठवला जातो. त्यामुळे हा सुरक्षित मानला जातो.

Buy Now, Pay Later चा पर्याय निवडा
ऑनलाईन व्यवहारांसाठी डेबिड-क्रेडिट कार्ड्सचा वापर अत्यंत फेमस झाला आहे. Buy Now, Pay Later सर्व्हिस व्यवहाराचा पर्याय असतो. युजर्सला बँक डिटेल्सची माहिती द्यावी लागणार नाही. त्यामुळे थर्डपार्टी गेटवेचा वापर होऊ शकत नाही. हा पर्याय सुरक्षित मानला जातो.

संशयित वेबसाईटवरून करू नका पेमेंट
अनेकदा ब्राऊजरवर ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या पॉप-अप्स येत असतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी वेबसाईटवरून पेमेंट करताना विशेष खबरदारी घ्यायला हवी नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. या वेबसाईटवरून गोपनीय आर्थिक माहिती चोरी होण्याचा धोका असतो.

पॅडलॉकची सिक्युरिटी तपासा
जेव्हा तुम्ही कधी कोणत्याही वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुम्ही URL ची सुरुवात कशी होती हे तपासून घेणे गरजेचे आहे. HTTP ने सुरु होणारी लिंक्स असुरक्षित असते. मात्र, सुरक्षित वेबसाईटचा पॅडलॉक HTTPs ने सुरु होते. तसेच एक सिम्बॉलही असतो.