अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ पाहून ‘Big B’ झाले भावुक; जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गुरु या चित्रपटानंतर अभिषेक बच्चनला एक अस्सल अभिनेता म्हणून लोक ओळखायला लागले असे जर आपण म्हंटलो तर त्यात काही वावगं ठरणार नाही. केवळ महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून त्याची ओळख प्रस्थापित झाली कारण यापूर्वी त्यानं जेवढे चित्रपट केले त्यात त्याच्या वाट्याला पुरेसे यश आले नाही. त्यातून बाहेर पडण्याचा अभिषेकनं प्रयत्न केला खरा. मात्र त्यातही त्याला अपयश आलं. त्यानं वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले पण प्रेक्षक अजूनही त्याला हिरो म्हणून स्वीकारायला काय तयार नाहीत. २००७ साली आलेल्या गुरु चित्रपटात अभिषेकनं साकारलेली भूमिका प्रचंड ठसा उमटवून गेली होती. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता अनुराग बसु दिग्दर्शित लुडो चित्रपटात त्याच्या वाट्याला आलेली छोटीशी भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. आता अभिषेकचा बिग बुल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

बिग बुल हा चित्रपट आता प्रदर्शित असून यातील अभिषेकच्या कामाचं कौतूक होत आहे. केवळ प्रेक्षकांनाच नाहीतर साक्षात अमिताभ यांनाही अभिषेकच्या कामानं एकदम भारावून टाकलं आहे. ज्यावेळी बिग बींनी त्याचा चित्रपट पाहिला त्यावेळी ते म्हणाले, “आपल्या मुलाचं काम पाहून मी भारावून गेलो आहे. अभिषेकनं त्यात चांगलं काम केलं आहे.” बिग बींनी या चित्रपटाचा प्रिमियर पाहिला व जया बच्चन या चित्रपट प्रदर्शनापूर्वी पाहत नाहीत.