Pashan (Pune) : पाषाण मधील जेष्ठ नागरिकांची बिल्डर परांजपे बंधूंविरुद्ध तक्रार

पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील लोकप्रिय बिल्डर परांजपे यांच्या ‘अथश्री’ अपार्टमेंट पाषाण येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. बिल्डर परांजपे बंधू श्रीकांत आणि शशांक परांजपे यांच्याविरुद्धची चतु:शृंगी पोलिस फसवणुकीची तक्रार दाखल केली. बिल्डरने केलेल्या करारनाम्यानुसार सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत असे या जेष्ठनागरिकांचे म्हणणे आहे. सुहास पणासी (७२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार (बांधकाम, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण नियमन) कायदा कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 120-बी नुसार श्रीकांतआणि शशांक परांजपे यांच्यावर फसवणुकीचा तसेच नियम उल्लंघन या कलामामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

परांजपे स्कीम कडून २००३ मध्ये पाषाण येथे अथश्री अपार्टमेंट बांधण्यात आले होते. तक्रारदाराने बिल्डरने पहिल्या व्यवहारात ज्या सोयीसुविधा देण्याचे मान्य केले होते जसे की, पार्टी हॉल, सामान्य अतिथी कक्ष, ग्रंथालय, वैद्यकीय कक्ष इत्यादींची रीतसर नोंदणी केली नाही. तसेच प्रकल्पाची बोगस कागदपत्रे तयार केली आणि खरेदी करण्याच्या वेळेस ती दिली. आणि नंतर मात्र प्रत्यक्ष पझेशनच्या वेळेस वेगळीच कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. पुणे महापालिकेच्या परवानगीशिवाय बिल्डरने अवैधरित्या लायब्ररी, एम्फीथिएटर, दोन डाइनिंग हॉल आणि स्वयंपाकघरे तयार केली आहेत. असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

पीएमसीने जेव्हा सोसायटीला नोटीस पाठवली त्यावेळी फ्लॅट धारकांच्या ही बाब लक्षात आली. सोसायटीच्या लोकांनी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संदर्भात प्रथम ‘पुणे मिरर’ यांनी हे वृत्त दिले. या गुन्ह्या प्रकारणी शशांक परांजपे यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी,”आम्ही सर्व सोयी सुविधा या करारानुसार दिल्या आहेत. पण मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, आज पंधरा वर्षांनंतर का तक्रार दाखल केली? आम्ही या सोसायटीचा प्लान पुणे महापालिकेच्या नियमानुसारच केला आहे. तसेच आम्ही त्याचे खरे नकाशे आणि करारपत्र दिले आहे. यात कोणतेही अनधिकृत काम केलेले नाही.