सोने तस्करी प्रकरणात IAS अधिकारी एम. शिवशंकर निलंबीत, तपास सुरू

तिरुवनंतपुरम : केरळ सरकारने गुरूवारी सोने तस्करी प्रकरणातील आरोपींशी कथित संबंधावरून वरिष्ठ आयएएस अधिकारी एम. शिवशंकर यांना तपासादरम्यान निलंबीत केले आहे. तर, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार यूएई व्यापार दूतावासात तैनात अधिकारी अपल्या देशात रवाना झाले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी येथे पत्रकार परिषदेत शिवशंकर यांच्या निलंबनाची घोषणा केली.

शिवशंकर यांचा संबंध कथितप्रकारे प्रकरणातील आरोपींशी असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना मुख्य सचिव आणि आयटी सचिव पदावरून हटवण्यात आले होते. मुख्य सचिव डॉ. विश्वास मेहता यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीला सरकारने आरोपींची पडताळणी करणे आणि तीन दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितले होते. सरकारला आज सांयकाळी रिपोर्ट देण्यात आला, ज्यानंतर ही कारवाई केली गेली.

त्यांनी म्हटले की, विभागस्तरीय तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सीमाशुल्क अधिकार्‍यांनी याप्रकरणी शिवशंकर यांची सुमारे नऊ तास चौकशी केली होती. या घटनाक्रमाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, व्हिएन्ना करारानुसार सूट प्राप्त व्यापार दुतावासाचा अधिकारी रविवारी येथून दिल्लीत पोहचला आणि तेथून एका उड्डाणानाद्वारे संयुक्त अरब अमीरातला रवाना झाला.