आता जगातील सर्वाधिक Download केलं जाणारे अ‍ॅप ‘Telegram’; WhatsApp ला मोठा फटका

पोलीसनामा ऑनलाइन टीम –    जगातील सर्वाधिक डाउनलोड केले जाणारे नॉन गेमिंग अ‍ॅप आता टेलीग्राम (Telegram) हे बनले आहे. तर हे अ‍ॅप टेलीग्राम चे इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅप आहे. तर जानेवारी महिन्यात झालेल्या टेलीग्रामच्या एकूण डाउनलोडिंगमध्ये २४ टक्के वाटा हा एकट्या भारताचा झालं आहे. यासंदर्भातसेन्सर टॉवरने आपल्या नव्या रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे. सेंसर टावरने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, जानेवारीच्या महिन्यात तब्बल ६.३ कोटी लोकांनी टेलीग्राम अ‍ॅप डाउनलोड केले आहे. यांपैकी १.५ कोटी डाउनलोड्स एकट्या भारतातील आहे. असे टेलेग्रामाने खुद्द माहिती दिली आहे.

टेलीग्राम अ‍ॅपच्या डाउनलोडिंगमध्ये झालेली ही वाढ व्हॉट्सअ‍ॅप च्या नव्या पॉलिसीनंतर बघायला मिळाली आहे. सध्या व्हाट्सअ‍ॅपने आपली पॉलिसी ३ महिन्यांसाठी स्थगित केली आहे. तर भारतानंतर आता इंडोनेशियामध्ये टेलीग्राम अ‍ॅप सर्वाधिक डाउनलोड करण्यात आले आहे. तसेच जानेवारी महिन्यात TikTok अ‍ॅप एकूण ६.२ कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे. यांपैकी १७ टक्के लोक चीनमधील आहेत. आणि यानंतर १० टक्के लोक अमेरिकेतील आहेत.

या दरम्यान, डिसेंबर महिन्यात TikTok हे सर्वाधिक डाउनलोड केले गेलेले अ‍ॅप होते. त्यावेळी टेलीग्राम टॉप-5 मध्येही नव्हते. मात्र, केवळ एका महिन्यातच टेलेग्राम प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे. जानेवारी २०२१ मधील डाउनलोडिंगच्या बाबतीत इंस्टाग्राम ६ व्या स्थानावर आहे आणि यानंतर नॉन-गेमिंग अ‍ॅपमध्ये Zoom, MX Taka Tak, Snapchat आणि Messenger ची सर्वाधिक डाउनलोडिंग झाली आहे. हे आकडे Google Play Store आणि Apple App Store या दोन्हींचे आहेत. तर त्याच महिन्यात टेलीग्रामच्या डाउनलोडिंगचा आकडा ५० कोटींवर गेला.

टेलीग्रामने जानेवारी महिन्यात सांगितले होते, की जगभरात त्याच्या डाउनलोड्सची संख्या ५० कोटींच्याही पुढे गेली आहे. केवळ ७२ तासांत टेलीग्रामवर २.५ कोटी नवे युझर्स रजिस्टर्ड झाले होते. यासंदर्भात खुद्द टेलीग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी सांगितले. तर टेलीग्रामीकडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मासिक पर्यटक वापरकर्ते Monthly Tourist Usersची संख्या ५० कोटी एवढी होती. ती पुढच्या आठवड्यात केवळ ७२ तासांत ५२.५. कोटी झाली आहे.असे टेलीग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी सांगितले.