Serum Institute of India | सीरम पुढील महिन्यापासून मुलांसाठी सुरू करणार कोवोव्हॅक्सची ट्रायल ! सप्टेंबरपर्यंत लाँचिंगची अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) मध्ये पुढील महिन्यात म्हणजे जुलैपासून मुलांवर नोवाव्हॅक्स (Novavax) ची व्हॅक्सीन कोवोव्हॅक्स (Covovax) ची ट्रायल सुरू होऊ शकते. या बाबतची माहिती एका रिपोर्टमध्ये मिळाली आहे. Serum Institute of India | serum could start trial of covovax on children from next month expected to launch by september

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

नोवाव्हॅक्सने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सीरमसोबत उत्पादन करण्याची घोषणा केली होती. सीरमने अपेक्षा व्यक्त केली आहे की कोवोव्हॅक्स देशात सप्टेंबरपर्यंत लाँच होऊ शकते. नोवाव्हॅक्सने माहिती दिली होती की, अलिकडेच करण्यात आलेल्या ट्रायल्समध्ये चांगले परिणाम दिले आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या संदर्भाने सांगण्यात आले आहे की.
सीरम जुलैपासून नोवाव्हॅक्सची कोविड-19 व्हॅक्सीन NVX-CoV2373 च्या ट्रायलची सुरुवात करू शकते.
या आठवड्यात नोवाव्हॅक्सने घोषणा केली होती की, व्हॅक्सीनने PREVENT-19 फेज 3 ट्रायलमध्ये चांगले निकाल दिले आहेत.
या ट्रायल्स अमेरिका आणि मेक्सिकोच्या 119 साईटवर झाल्या होत्या.
ट्रायल्सच्या नंतर मिळालेल्या डेटानुसार, व्हॅक्सीनचा एकुण प्रभाव दर 90.4 टक्के होता.

नोवाव्हॅक्सकडून ट्रायल डेटाची घोषणा केल्यानंतर भारतात कोविड-19 टास्क फोर्सच्या प्रमुखांनी लवकरच ट्रायल्स सुरू होण्याबाबत म्हटले होते.
त्यांनी सीरमला मुलांच्या संख्येवर उशीर न करता व्हॅक्सीनच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू करण्याचे आवाहन केले होते.
मंगळवारी पॉल यांनी एक पत्रकार परिषदेत म्हटले की,
सार्वजनिक प्रकारे उपलब्ध आकडे हे संकेत सुद्धा देताता की, लस अतिशय सुरक्षित आणि प्रभावी आहे.

Web Title :- Serum Institute of India | serum could start trial of covovax on children from next month expected to launch by september

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 effect | कोरोना लॉकडाऊनमध्ये वाढू लागला डोळ्यांचा गंभीर आजार Myopia चा धोका, जाणून घ्या याची कारणे आणि लक्षणे

जर तुमच्याकडे असेल 1994 चे हे नाणे तर मिनिटात कमावू शकता 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल?

SIP : या स्कीममध्ये करा 4500 रुपयांची गुंतवणूक, बदल्यात मिळतील 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त; जाणून घ्या कसे?