‘म्हणून शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन अनिवार्य करा’ : सोनाक्षी सिन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा खानदानी शफाखाना हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. आपल्या आगामी सिनेमाला घेऊन सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच आता शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक शिक्षण हा विषय अनिवार्य केला गेला पाहिजे अशी मागणी सोनाक्षी सिन्हाने केली आहे. सोनाक्षीचा खानदानी शफाखाना हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे.

या सिनेमाची खासियत म्हणजे सेक्सबाबतीत आपल्या मनात कसे गैरसमज असतात आणि आपण नेहमीच त्यावर बोलणं कसं टाळतो या सगळ्या बाजूंवर हा सिनेमा विनोदी अंगाने भाष्य करत आहे. आता प्रेक्षकांना हा सिनेमा किती आवडतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

तसं तर सगळेच असं दाखवतात की, ते खूप पुढारलेले आहेत, सुधारणावादी विचाराचे आहेत. पंरतु सेक्सचा विषय निघाला की, ते संकोच करताना दिसतात. समाजातील लोकांच्या याच वृत्तीवर हा सिनेमा भाष्य करत आहे. जुनाट विचारांच्या याच वृत्तीवर हा सिनेमा प्रकाश टाकताना दिसतो. त्यामुळेच सेक्स एज्युकेशन शाळेत दिलं जावं आणि ते गरजेचं आहे असं सोनाक्षी सिन्हाने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला होता. चाहत्यांचा या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. नुकताच या सिनेमाचा दुसरा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बात तो करो अशा शीर्षकाने हा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. 2 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –