Shah Rukh Khan | वयाच्या 57 व्या वर्षी स्टंटबाजी कशी करतो या प्रश्नावर शाहरुख खानचे उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. शाहरुखचा चाहता वर्ग लाखोंमध्ये असून अनेक वर्षे तो बॉलीवुडवर ‘किंग खान’ (King Khan) म्हणून राज्य करतो आहे. अभिनेता शाहरुखला त्यांच्या फॅन्स सोबत जोडलेले रहायला आवडते. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फॅनसोबत संवाद साधताना दिसतो. शाहरुखने (Shah Rukh Khan) आता ट्विटरवर ‘आस्क एस आर के’ (Ask SRK) असा उपक्रम घेत आहे. यामध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नांची मिश्किल उत्तर देत असतो.

अभिनेता शाहरुख खान हा सुपरस्टार असल्याने त्याच्या आयुष्यात काय चालू आहे तो वैयक्तिक आयुष्य कसे जगतो. याविषयी चाहत्यांना उत्सुकता असते. या विकएन्डला शाहरुखने पुन्हा असा उपक्रम सोशल मीडियावर घेतला. चाहत्यांनी त्याला त्याच्या आगामी पिक्चर, (Shah Rukh Khan Upcoming Movie) त्याचा फिटनेस, अभिनय आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न केले. शाहरुखला एवढे वय असताना स्टंटबाजी कशी करतो असे प्रश्न विचारण्यात आले. या आस्क एस आर के या सेशनमध्ये शाहरुखला त्याच्या फॅनने एकत्र सिगारेट ओढायची का ? असा प्रश्न केला त्यावर शाहरुखने उत्तर देत सांगितले की माझ्या वाईट सवयी मी एकट्याच करतो. (Shah Rukh Khan Addiction ) तसेच फॅन्सने रिकाम्या वेळेत काय करतो असा प्रश्न केला तर शाहरुखने मी जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवतो असे सांगितले.

शाहरुखला त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असल्याने त्याच्या रिलीजसंबंधीत आणि टीझरबाबतीत (Jawan Teaser) प्रश्न चाहत्यांनी केले यावर शाहरुखने काही गोष्टी तयार होत आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही सगळं वेळेवर सुरु आहे असा शब्दात त्याने उत्तर दिले. चित्रपट बघायला जाताना पट्टी बांधून जायचे का ? असे चाहत्याने विचारले असता शाहरुखने मिश्किल उत्तर देत ‘नाही फक्त जवानच्या दिवशी तरूणाईने उत्साहात थिएटरमध्ये जावे’ असे उत्तर दिले. (Jawan Release Date) एका फॅनने विचारले सर वयाच्या 57व्या वर्षी इतके अ‍ॅक्शन-स्टंट करण्यामागचे रहस्य काय? यावर शाहरुखने (Shah Rukh Khan) रिप्लाय दिला की, भाऊ, खूप पेनकिलर खावे लागतात. त्याच्या उत्तरावर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत .शाहरुखने आधीही असे सेशन केले आहे. त्याने स्विगीवरुन (Swiggy) एकाला उत्तर दिले होते. तर स्विगीने मन्नत (Mannat) बाहेर डिलिव्हरी बॉयतर्फे जेवण पाठवले होते.

Web Title :  Shah Rukh Khan | shah rukh khan reveals secret to do stunts at age 57 jawan teaser coming soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा