#MeToo : ‘या’ अभिनेत्रीवर 14 व्या वर्षीच झाले लैंगिक अत्याचार 

मुंबई : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर मीटू ची मोहीम जोरात सुरु आहे. अनेक महिला या मोहीमेअंतर्गत आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडत आहेत. आपल्याला आलेले वाईट अनुभव लोकांना सांगत आहेत. बाॅलीवूडमध्ये याचं चांगलंच वादळ सुरु असून अनेक अभिनेते तसेच दिग्दर्शक याच्यात अडकलेले आहेत. विश्वास बसणार नाही परंतु त्यांच्यावर अत्याचाराबद्दल गुन्हा दाखल आहे असेही काही चेहरे आहेत. आता आमिर खानसोबत सिनेमात दिसलेल्या अभिनेत्रीवर वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक अत्याचार झाला होता अशी माहिती समोर आली आहे. शमा सिंकदर असं या अभिनेत्रीचे नाव आहे. #MeToo च्या अंतर्गत तिने आपलं दुःख शेअर केलं आहे.  ही अभिनेत्री  बॉलिवूड अभिनेता आमीर खानसोबत ‘मन’ या सिनेमात दिसली होती.
फिल्म जगतात या दिवसांत #MeToo चं कॅम्पेन सुरू आहे. ज्यामध्ये अभिनेत्री आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल बोलत आहेत. या आरोपांतर्गत अनेक बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी समोर आली आहेत. बॉलिवूड लाईफला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शमाने आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळातील गोष्ट शेअर केली आहे. अवघ्या 14 वर्षांची असताना एका दिग्दर्शकाने माझ्या मांड्याना हात लावला होता असा अनुभव तिने सांगितला आहे. वयाच्या 14 व्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने उघड केले.
तिचा अनुभव सांगताना ती म्हणाली की, ‘दिग्दर्शकाने माझ्या मांड्याना हात लावला होता त्यानंतर मी दिग्दर्शकाला विरोध केला. तेव्हा त्या दिग्दर्शकाने मला सांगितलं की, तुला कुणीच सोडणार नाही. मग तो दिग्दर्शक असो वा अभिनेता किंवा प्रोड्युसर. तुम्हाला प्रगती करायची असेल तर असं होणारच त्याशिवाय तू प्रगती करूच शकत नाही.’ शमा सिंकदरने ही गोष्ट शेअर करत सांगितलं की, ‘मी या घटनेने खूप घाबरले.’ मुलाखतीत शमाने आलोकनाथ यांच्यावर देखील वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली की, ‘माझ्यासाठी हे खूप शॉकिंग होतं. मी कधी आलोकनाथसोबत कधी काम केलं नाही. पण त्यांना मी चांगला माणूस समजत होते.’