MLA Bachchu Kadu | ‘अजित पवारांच्या सोयीनुसार खातेवाटप’, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडल्याने प्रहार जनशक्ती पार्टीचे (Prahar Jan Shakti Party) आमदर बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी अनेकवेळा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी सरकारला पाठिंबा देत सत्तेत सामील झाले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र खातेवाटपाचा पेच निर्माण झाल्याने खातेवाटप लांबणीवर पडले. अखेर काल मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. यामध्ये अजित पवार यांना पुन्हा अर्थमंत्रीपद (Finance Minister) देण्यात आल्याने शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) नाराज असल्याची चर्चा आहे. यावर आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांच्याकडे अर्थखातं देऊ नये, यासाठी शिंदे गटातील आमदार विरोध (Maharashtra Political News) करत होते. असं असताना त्यांच्याकडेच अर्थखाते दिलं. तसेच महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार नारज असल्याचे बोललं जात आहे. यावर बोलताना बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव टाकला आणि यशस्वी झाले.

खातेवाटपावर बोलताना बच्चू कडू पुढे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात उशिरा आलेल्यांना राष्ट्रवादीकडून झुकतं माप दिलं आहे,
असं दिसतंय. आता जे काही राहिलेले लोक आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल? हे मला माहीत नाही. आता जे खातेवाटप झालंय,
ते अजित पवार यांच्या सोयीनुसार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव टाकला आणि ते यशस्वी झाले, असं एकंदरीत दिसतंय.

अजित पवारांकडे अर्थखातं देण्यासंदर्भात विचारले असता बच्चू कडू म्हणाले, अजित पवारांना अर्थखाते मिळू नये, असं सर्वांचं मत होतं.
कारण ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेची (Shivsena) सत्ता होती.
त्यावेळी अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना 25 लाख तर राष्ट्रवादीच्या आमदारांना 90 लखांचा निधी देत होते.
मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आहेत. त्यामुळे ते अजित पवारांवर नजर ठेवतील, असं वाटतंय.

Web Title :  MLA Bachchu Kadu | bachchu kadu on cabinet expansion and portfolio distribution ajit pawar get finance ncp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा