Shani Asta 2021 : 35 दिवसांसाठी शनीचा अस्त, ‘या’ 3 राशीवाल्यांनी व्हावे सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  न्यायाचा ग्रह शनी 7 जानेवारी 2021 पासून 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत अस्त राहिल. शनी यावेळी मकर राशीत आहे आणि 14 जानेवारीला सूर्य सुद्धा धनुतून मकर राशीत जाणार आहे. 7 जानेवारीला दोन्ही ग्रहांमधील अंतर कमी झाले होते. सूर्यदेवाच्या जवळ आल्याने शनी किंवा अन्य कोणताही ग्रह अस्त होतो. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, सूर्याच्या प्रभावामुळे अस्त झालेल्या शनीचा सवृ राशींवर परिणाम होईल. या दरम्यान, ज्या लोकांना शनीची साडेसाती आणि पाया सुरू आहे, त्यांनी जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे.

मेष –

मेष राशीच्या जातकांनी पैसे उधार घेणे टाळावे. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मेहनत करणार्‍यांना यश निश्चित मिळेल. मात्र, परिणाम थोड्या उशीराने येऊ शकतात. आळसाचा त्याग करावा लागेल आणि धैर्य सोडू नका. सूर्याच्या मंत्राचा एका माळेचा मंत्रजप (ओम सूर्य ग्रहण सूर्याय नम:) नियमित केल्याने लाभ मिळेल.

वृषभ –

शनी अस्त झाल्याने वृषभ राशीच्या जातकांमध्ये थोडी घबराट जाणवले. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मोठे निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक घ्या. व्यवहारात आलेला चिडचिडेपणा शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांतीसाठी भगवान शंकराला जल अर्पण करत राहा आणि ओम नम: शिवायचा जप करा.

मिथुन –

मिथुन राशीवाल्यांना वाणीवर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल. ईमानदारीने कामांमध्ये निश्चित यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुखशांतीसाठी शनिवारी किमान 5 गरीबांना हिरव्या रंगाची फळे दान करावीत.

कर्क –

कर्क राशीच्या जातकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. याशिवाय शनीचा अस्त झाल्याने त्यांना कोणतीही विशेष समस्या होणार नाही. आपल्या कामात नियमित वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. अस्त झाल्यानंतर शनी तुम्हाला चांगले परिणाम देईल, यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही.

सिंह –

सिंह राशीवाल्यांसाठी ही वेळ आपला आत्मविश्वास वाढवणे आणि कौटुंबिक नाते मजबूत करण्याची आहे. प्रवासाला जाण्यासाठी वेळ अनुकूल आहे. मेहनतीचे परिणाम उशीराने मिळतील, परंतु चांगले असतील. सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि रविवारच्या दिवशी किमान 5 गरिबांना अन्नदान करा.

कन्या –

कन्या राशीच्या जातकांना कामात यश मिळेल. बँक बॅलन्स वाढू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. मात्र, व्यापारी प्रकरणात थोडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाशी संबंधीत जातकांना या दरम्यान चांगले परिणाम मिळतील. मंगळवारी हनुमान चालीसाचे पठन करा आणि हनुमानाला बूंदीचा प्रसाद अर्पण करा.

तुळ –

तुळ राशीच्या जातकांनी कोणतीही चिंता न करता पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने आपले काम करत राहावे. शनीदेव तुमच्या मेहनतीसोबत न्याय करतील. मोठ्या कालावधीपासून अडकलेली कामे या काळात पूर्ण होतील. 5 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारी दरम्यान काळा खुपच शुभ आहे.

वृश्चिक –

वृश्चिक राशीवाल्यांसाठी अस्त शनी खुपच शुभ मानला जात आहे. मेहनतीचे फळ मिळेल. विशेषकरून सिक्युरिटी एजन्सीसोबत काम करत असलेल्या लोकांची प्रगती होऊ शकते. आपल्या उर्जेचा योग्य वापर करणे आणि सकारात्मक विचाराने पुढे वाटचाल केल्याने दुप्पट लाभ होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु –

धनु राशीला शनीची साडेसाती सुरू आहे. पण तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिले तर अडचणी कमी होऊ शकतात. आळसापासून दूर राहा. मेहनत करण्यापासून दूर जाऊ नका आणि योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. शनीदेव तुमचे अजिबात नुकसान करणार नाही. कामात थोड्या अडचणी असू शकतात, परंतु तरी सुद्धा स्थिती नियंत्रणात राहील. प्रत्येक शनिवारी नियमितपणे सुंदरकांडचे पठन करा.

मकर –

शनीचा अस्त झाल्याने तुमच्या कामाची गती थोडी प्रभावित होऊ शकते, लेकिन ते निरंतर चालत राहील. इमानदारी आणि मेहनतीने काम केल्याने चांगले परिणाम मिळतील. या राशीला सुद्धा शनीची साडेसाती सुरू आहे. प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठन करा आणि किमान 8 गरीबांना अन्नदान करा.

कुंभ –

कुंभ राशीला सुद्धा शनीची साडेसाती आहे. भावनिक होऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना प्रथम घरातील सदस्यांचा सल्ला घ्या. या काळात कोणत्याही प्रकारची गुंतवणुक तर अजिबात करू नका. दूरचा प्रवास टाळा. कुटुंबात आनंद वाढेल आणि घरात सुखशांती येईल. शनिवारच्या दिवशी गरीबांना अशा पदार्थाचे वाटप करा जे तांदुळापासून बनवलेले असतील. तुमच्या पैशाच्या समस्या मार्गी लागतील.

मीन –

मीन राशीच्या जातकांनी धैर्य सोडू नये. ज्येष्ठांसोबत वाद होऊ शकतो. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबाच्या कामात सहकार्य केल्याने लाभ वाढेल. दररोज हनुमान चालीसा आणि एकमाळ गायत्री मंत्राचा जप केल्याने मनशांत राहील आणि चांगले परिणाम मिळतील.