Sharad Pawar On Datta Bharne | शरद पवारांची दत्ता भरणेंवर सडकून टीका, ”इथं एकाला निवडून आणलं, तिकीट दिलं, मंत्री केलं, पण…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –Sharad Pawar On Datta Bharne | इथं आपण एकाला निवडून आणलं, तिकीट दिलं, मंत्री केलं, पण त्यांनी काम केलं नाही. वैयक्तिक फायदा केला, त्यामुळे त्यांना बाजूला करा. उद्याच्या लोकसभा निवडणुकीत याबाबत तुम्ही निर्णय घ्या. देशात सुप्रिया सुळे यांचे काम आहे. संसदेत पहिल्या दोन खासदारांमध्ये त्या आहेत, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाव न घेता दत्ता भरणे यांच्यावर सडकून टीका केली. ते इंदापूरमध्ये बोलत होते. (Baramati Lok Sabha)

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवारांच्या गटात गेलेल्या आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यावर शरद पवारांनी टीकास्त्र डागले.

शरद पवार पुढे म्हणाले, तुतारी लक्षात ठेवा नवीन चिन्ह आहे. सगळीकडे पोहोचवा.
ज्यांचा सहकारी संस्थेत चांगला लौकिक आहे, असे आप्पासाहेब जगदाळे आपल्याकडे आले आहेत.
देशात लोकसभा निवडणूक आहे, यावेळी लोकांची मनस्थिती वेगळी आहे.

शरद पवार म्हणाले, काल मी साताऱ्यात होतो. शशिकांत शिंदेंचा अर्ज भरला, तेव्हा २० हजार लोक उन्हात उभे होते.
हेच चित्र सगळीकडे आहे. आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही असे चित्र आहे, असे पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

JM Road Firing Pune | पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न (CCTV Footage Video)