JM Road Firing Pune | पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न (CCTV Footage Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – JM Road Firing Pune | पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा एका व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी (दि.16) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरगडे हाऊस (Argade House JM Road) या ऑफिसच्या खाली असलेल्या रोडवर घडला. भरदिवसा गजबलेल्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. धीरज दिनेशचंद्र आरगडे (वय 38 रा. कोहिनूर इस्टेट, मुळारोड, वाकडेवाडी, खडकी) असे व्यावसायिकाचे नाव आहे.

धीरज आरगडे हे त्यांच्या आरगडे हाऊस या ऑफिसच्या खाली येऊन रोडवर पार्क केलेल्या गाडीत बसले होते. त्यावेळी दुचाकीवरुन हेल्मेट घातलेले दोन व्यक्ती आले. त्यांनी अंगावर स्वीगीच्या लाल टीशर्ट सारखा टी शर्ट घातला होता. हल्लेखोर त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी त्यांच्यावर दोन राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला. मात्र फायर झाले नाही. आरगडे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपी शिवाजीनगर गावठाणच्या (Shivaji Nagar Gaothan) दिशेने पळून गेले. आरोपींनी पळून जाताना ‘तू आता वाचला रे’ असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर आरगडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (Sandeep Singh Gill) , सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे (ACP Sainath Thombre), वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (PI Chandrashekhar Sawant) यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील आणि आरोपी ज्या दिशेने पळून गेले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले जात आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज