Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On Drought Situation | राज्यात पाऊस कमी झाल्याने अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना तसेच काही भागात लोकांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे.(Sharad Pawar On Drought Situation)

शेतकरी संघटनांच्या वतीने शासनाने चारा छावण्या सुरु करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच संभाजीनगर येथे दुष्काळ परिस्थिती उपाययोजनांच्या संदर्भाने संभाजीनगरला दौरा केला आहे.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या वतीने राज्यसरकारला काही मागण्या केल्या आहेत.

महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यामध्ये एकूण १९ जिल्हे त्यातील ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत.

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणले की ” महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे.
ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असू शकतो तसेच यामुळे
परिस्थिती भीषण ठरेल ” असे पवार यांनी सांगितले.

मराठवाड्यात महत्वाची ४० धरणे आहेत मात्र यात फक्त १६ टक्के पाणीसाठा आहे. यासह इतर विभागाची हीच परिस्थिती आहे.
संभाजीनगरला ८१ लघुप्रकल्प आहेत त्याठिकाणी फक्त सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पुण्यात ५० प्रकल्प आहेत यात फक्त २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पवारांनी दिली.
देशभरातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत मात्र पाण्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जायकवाडी धरणात ५. टक्के जलसाठा असल्याचेही ते म्हणाले.
या परिस्थितीशी सामना करण्यासाठी पवारांनी सरकारकडे काही मागण्याही खेळूया आहे.

पवारांनी सरकारकडे केल्या या मागण्या

१) मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याने तेथे पाण्याचे टँकर वाढवावेत. या जिल्ह्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर गंभीर परिस्थती निर्माण होऊ शकते.

२) विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने राज्यसरकारने याबाबत केंद्रसरकारला विमा कंपन्यांची बोलायला सांगावे.

३) शेतकऱ्यांची वीज खंडित करू नये, वीजबिलात सूट देण्यात यावी.

४) मनरेगाच्या कामातील निकष शिथिल करावेत.

५) ज्याठिकाणी अति दुष्काळ आहे तेथील शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी.

६) फळबागांना अनुदान देण्यात यावे.

७) पाणीप्रश्न गंभीर असणाऱ्या ठिकाणी चारा छावण्या सुरु कराव्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”