Sharad Pawar On PM Modi | हवा तसा निकाल येण्यासाठी मोदींनी निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत बदल केला : शरद पवार

बारामती : Sharad Pawar On PM Modi | मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहेत. हवी ती व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते बारामती (Baramati Melava) येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना मी केली. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निकाल
दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही. ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधीमंडळात मी आणले होते.
काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहेत. ते वेळ देतात, कष्ट करतात.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांची धोरणं मला पटत नाहीत.
मोदी बारामतीत आले होते. त्यावेळी म्हणाले होते की माझे बोट धरुन ते राजकारणात आले.

शरद पवार म्हणाले, संसद संस्था आपण जतन केली पाहिजे. मागील अधिवेशनात पंतप्रधान २४ मिनिटांसाठी आले.
संसदेत बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही, असे असेल तर लोकशाही धोक्यात येईल.
यातून असे दिसत की, या संस्थाबद्दल त्यांना आस्था वाटत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Pratibha Dhanorkar | काँग्रेसमध्ये खळबळ! दिवंगत खासदाराच्या आमदार पत्नीचा आरोप, पक्षातील गटबाजीनेच माझ्या पतीचा…

PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकी आणि शास्तीकर वसुलीला स्थगिती; लोकसभेच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यकर्ते झोपेतून जागे झाले?

Shasan Applya Daari In Kasba Peth Pune | शासन आपल्या दारी उपक्रमाला कसबा मतदारसंघात उस्फुर्त प्रतिसाद