Sharad Pawar | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईवर शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपण राजीनामा देणार, असे म्हंटले आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला आहे. पण शरद पवार (Sharad Pawar) यांनी आतापर्यंत या प्रकरणात प्रवेश केला नव्हता. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांना या प्रकरणी फोन केला आहे.

राजकीय आकसापोटी किंवा राजकीय हेतून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होऊ नये, असे शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. त्यावर महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात कोणताही राजकीय आकस नाही, जितेंद्र आव्हाड आणि माझे संबंध चांगले आहेत. कारवाईत सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड
आणि शिवसंग्राम या पक्षांनी केला होता. तसेच इंद्रजित सावंत आणि डॉ. श्रीमंत कोकाटे या इतिहास अभ्यासकांनी
देखील हा आरोप केला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत ठाण्यातील एका चित्रपटगृहातील
चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता. त्यावरुन जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या 12 कार्यकर्त्यांना अटक करण्यात
आली होती. त्यांची जामीनावर सुटका होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर मुंब्रा पोलिसांत (Mumbra Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Web Title :-  Sharad Pawar | sharad pawar call cm eknath shinde over jitendra awhad fir molestation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update