Sharad Pawar Speech In NCP Mahila Melava | महिलांच्या प्रश्नावर शरद पवार आक्रमक, रस्यावर उतरण्याचे आवाहन करत म्हणाले – ‘केसेस टाकल्या तरी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar Speech In NCP Mahila Melava | महिलांच्या बाबतीमधील मणिपूरची घटना समोर आल्याने आपल्याला जागरुक राहावे लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठे घडला तर भगिनींनी रस्त्यावर उतरावे. काय होईल, तर ते केस टाकतील. विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar NCP) यांनी महिलांना केले आहे. (Sharad Pawar Speech In NCP Mahila Melava)

मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात (NCP Mahila Melava) पवार बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पवारांनी आक्रमक वक्तव्य करत महिलांना आवाहन केले.

शरद पवार म्हणाले, संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला. आता महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची बाजू एका बाजूला आहे, तर दुसरीकडे महिलांच्या बाबतीमधील मणिपूरची घटना समोर येते. त्यामुळे जागरुक राहावे लागणार आहे. आता असा प्रकार कुठे घडला तर भगिनी रस्त्यावर उतरायला हव्यात. काय होईल, ते केस टाकतील, विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो. (Sharad Pawar Speech In NCP Mahila Melava)

पवार म्हणाले, आपल्याला काही कार्यक्रम हाती घाययचे आहेत यामध्ये महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत.
महिला आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झाले की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत.

पवार म्हणाले, शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली
आणि आता शाळा बंद करणे योग्य नाही. असे होत असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही.
सरकारी नोकरीची कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत.
आणि सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत हे योग्य नाही.

पवार पुढे म्हणाले, सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ्य असते, परंतु कंत्राटी पदावर नेमले तर तिथे आरक्षण नसल्याने
मला खात्री आहे तिथे महिलांना संधी मिळणार नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागेल.

पवार यांनी म्हटले, पावसाळी अधिवेशनात अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की १ जानेवारी पासून १ मे पर्यंत
किती महिला बेपत्ता आहेत? याचे उत्तर मिळाले की १९ हजार ५५३ महिला बेपत्ता आहेत. याचे रेकॉर्ड देखील आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar On Dhangar Reservation | आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर ‘धनगर जागर यात्रा’ काढणार