BJP MLA Gopichand Padalkar On Dhangar Reservation | आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर ‘धनगर जागर यात्रा’ काढणार

Rasta Roko Andolan For Dhangar Reservation | dhangar samaj will hold a rasta roko andolan on monday across the maharashtra informed by bjp mla gopichand padalkar

मुंबई : BJP MLA Gopichand Padalkar On Dhangar Reservation | महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेचे (Dhangar Jagar Yatra) आयोजन केले आहे. धनगर समाज बांधवांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या यात्रेची सुरुवात १२ ऑक्टोबरपासून होईल. (BJP MLA Gopichand Padalkar On Dhangar Reservation)

पडळकर यांच्या धनगर जागर यात्रेला मराठवाड्यातील येलडा येथून सुरुवात होईल. येलडा, कळंब, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सभा होतील. १२ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत २० ते २२ सभा होणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, प. महाराष्ट्र आणि कोकणात या सभा होतील. (BJP MLA Gopichand Padalkar On Dhangar Reservation)

याबाबत गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, सरकारकडून आश्वासन मिळाले आहे. पण अंमलबजावणीची आवश्यकता आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे आश्वासनावर थांबून जमणार नाही. सरकारची भूमिका सकारात्मक आहे.

पडळकर म्हणाले, २२ तारखेला कवठे महंकाळ येथील बिरोबावाडीत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने लोक येतील.

गोपीचंद पडळकर म्हणाले, सरकारमध्ये असलो तर माझ्यासाठी आरक्षणाची चळवळ महत्त्वाची आहे.
सरकारमधील माझी कामे मी करत आहे. पण, आरक्षणाच्या लढ्यासाठी लोकांमध्ये राहणे ही माझी जबाबदारी आणि
कर्तव्य आहे. म्हणून, आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत यात्रा सुरूच राहिल.
महिना दोन महिन्यात याबाबत सरकारने तोडगा काढवा, अशी अपेक्षा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बीबीएच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कोथरुड एमआयटी मधील घटना

Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रतेवर एक दिवस आधीच सुनावणी, कारण सांगताना राहुल नार्वेकर म्हणाले…

Pune Cyber Crime News | सायबर गुन्हेगारांचे ‘ऑनलाइन टास्क’ पडले महागात, पुण्यातील तरुणाची आर्थिक फसवणूक

Pune Crime News | पॉर्न व्हिडिओ दाखवून 17 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण, 23 वर्षाच्या तरुणाला अटक; कात्रज परिसरातील घटना

Total
0
Shares
Related Posts