Share Market | १३ कंपन्यांसाठी ‘परिसस्पर्श’ ठरले चांद्रयान-३ चे लँडिंग, भांडवल वाढले २०,००० कोटीने

नवी दिल्ली : Share Market | चांद्रयान-३ चे (Chandrayaan-3) यशस्वी लँडिंग १३ कंपन्यांसाठी ‘परिसस्पर्श’ ठरले आहे. या अशा कंपन्या आहेत ज्यांचा चांद्रयानाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध होता. या कंपन्यांच्या बाजार भांडवलात २० हजार कोटींहून जास्त रुपयांची भर पडली आहे. (Share Market)

विशेष म्हणजे चांद्रयानाने चंद्राला स्पर्श करताच या कंपन्यांचे भांडवल वाढले आहे, इतक्या रक्कमेत चांद्रयान-३ सारख्या ३४ हून जास्त मोहिमा अवकाशात करता येऊ शकतात.

चांद्रयान-३ लाँच झाल्यापासून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २०,७२७ कोटी रुपयांची (२.५ अरब डॉलर) वाढ झाली आहे. या कंपन्या रॉकेट कम्युनिकेशन (Rocket Communication), नेव्हिगेशन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट (Navigation Electronic Components), मेटल गिअर्स (Metal Gears) यासारख्या गोष्टी बनवतात. ब्लूमबर्गच्या मते, केवळ एका आठवड्यात कंपन्यांचे भांडवल २ अरब डॉलरपेक्षा जास्त वाढले आहे. (Share Market)

३३.३२ टक्क्यांपर्यंत वाढले कंपन्यांचे शेअर्स

  • या मिशनमध्ये सहकार्य करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स ३३.३२ टक्क्यांपर्यंत वाढले. इस्रोच्या (ISRO) रॉकेटसाठी कोबाल्ट-आधारित अलॉय तयार करणारी सरकारी कंपनी मिश्र धातू निगम कंपनीचा (Mishra Dhatu Corporation Company) शेअर चांद्रयान-३ लाँच झाल्यापासून ३३.३२ टक्क्यांनी वाढला आहे.
  • गॅस पुरवठादार लिंडे इंडियाचा शेअर २३% ने वाढला.
  • चांद्रयानाच्या प्रोपल्शन व लँडर मॉड्यूल्सच्या ऑनबोर्ड सिस्टम संबंधीत सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टॉकमध्ये ११% तेजी आली आहे.
  • सॅटेलाईड कम्युनिकेशन संबंधीत कंपनी एव्हेंटेलचे शेअर १२ टक्के वाढले आहेत.
  • विक्रम लँडर बनवणारी हिंदुस्तान एयरोनॉटिक्सच्या शेअरची किंमत एका दिवसातच ३.५ टक्के वाढली.
  • चांद्रयानच्या लाँचसंबंधी रॉकेटच्या बूस्टर संबंधीत कंपनी एलअँडटी चा शेअर एका दिवसात १.४७ टक्के वाढला.
  • चांद्रयानचे इंजिन बनवण्यासंबंधीत एमटीएआरच्या शेअरची किंमत सुमारे ५.१४ टक्के वाढली आहे.
  • चांद्रयानसाठी बायमेटेलिक अ‍ॅडप्टर पुरवणारी कंपनी भेल चे शेअर चांद्रयान लाँच झाल्यानंतर ११.५२ वाढले.
  • गोदरेज एअरोस्पेसचा शेअर १२.६२% वाढला आहे. या कंपनीने थ्रस्टर आणि इंजिनसंबंधी उपकरणे पुरवली आहेत.

एअरोस्पेसच्या या कंपन्यांना लाभ
चांद्रयान-३ शी थेट प्रकारे संबंध नसताना सुद्धा एअरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांना
चांद्रयान-३ संबंधीत कंपन्यांमध्ये आलेल्या तेजीचा लाभ मिळाला आहे.
यामध्ये पारस डिफेन्स अँड स्पेस टेकच्या शेअरची किंमत ५.४७ टक्के वाढली आहे.
याशिवाय भारत फोर्ज, एस्ट्रा मायक्रोवेव्ह, ‘स्टॉक्स बॉक्स’चे विश्लेषक रिचेज वॅनारा यांच्यानुसार, चांद्रयान-३ च्या
लाँचनंतर गुंतवणुकदारांमध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर खरेदी करण्यात रस दिसून येत आहे.
एका अंदाजानुसार आगामी काही वर्षातच स्पेस टूरिझम अनेक लाख कोटी रुपयांचा उद्योग बनू शकतो.
यानंतर सर्वात जास्त लाभ स्पेस आणि डिफेन्स संबंधीत कंपन्यांना मिळेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mental health | Perfect बनण्याच्या अट्टाहासात लोक होत आहेत मानसिक आजारी, जाणून घ्या ब्रेन कसा ठेवावा हेल्दी!

Ear Infection Increases During Monsoon: Here’s How You Can Deal With It Naturally

24 August Rashifal : कर्क आणि कुंभ राशीवाल्यांना मिळू शकते मोठी डील फायनल करण्याची संधी, वाचा १२ राशींचे दैनिक भविष्य

How To Reduces Belly Fat | उपवास केल्याने पोटाची चरबी जलद वितळते का? वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किती योग्य, जाणून घ्या एक्सपर्टचे मत