Share Market | ही मल्टीबॅगर कंपनी देत आहे १ बोनस शेयर, एका वर्षात ५२३% वाढला शेयर

नवी दिल्ली : Share Market | स्पेशलाईज्ड अ‍ॅग्रीकल्चर सीड कंपनी (Specialized Agricultural Seed Company) इंडो यूएस बायोटेक लिमिटेडने (Indo US Biotech Limited) मोठी घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेयर (Bonus Share) देत आहे. इंडो यूएस बायोटेक लिमिटेड इन्व्हेस्टर्सला १:१ च्या रेशोमध्ये बोनस शेयर (Share Market) देत आहे. (Multibagger Share)

म्हणजे, कंपनी प्रत्येक शेयरवर १ बोनस शेयर देईल. इंडो यूएस बायोटेकने यापूर्वी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना २ वेळा बोनस शेयरची भेट दिली आहे.

कंपनीने रिवाईज केली बोनस शेयरची रेकॉर्ड डेट
इंडो यूएस बायोटेक लिमिटेडने बोनस शेयरची रेकॉर्ड डेट रिवाइज्ड केली आहे. अ‍ॅग्रीकल्चर सीड कंपनीने अगोदर बोनस शेयरची रेकॉर्ड डेट शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३ ठरवली होती. कंपनीने आता बोनस शेयरची रेकॉर्ड डेट वाढवून ती २९ ऑगस्ट २०२३ केली आहे. कंपनीने यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये १:४ च्या रेशोमध्ये आणि नोव्हेंबर २०२१ ला १:५ च्या रेशामध्ये बोनस शेयर दिले आहेत.

१ वर्षात कंपनीच्या शेयरमध्ये ५२३% वाढ
इंडो यूएस बायोटेक लिमिटेडच्या शेयरमध्ये एका वर्षात अचानक तेजी आली आहे.
कंपनीचा शेयर ३० ऑगस्ट २०२२ ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (Bombay Stock Exchange) ८८.२० रुपयावर होता,
जो २४ ऑगस्ट २०२३ ला बीएसईमध्ये ५५० रुपयावर पोहचला.
इंडो यूएस बायोटेकच्या शेयरने मागील एक वर्षात गुंतवणूकदारांना ५२३ टक्के रिटर्न दिला आहे.
तर, मागील २ वर्षात कंपनीच्या शेयरमध्ये ८८० टक्के उसळी आली आहे.
यावर्षी आतापर्यंत इंडो यूएस बायोटेकच्या शेयरमध्ये २६७ टक्के तेजी आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | ‘वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा निर्णय, पक्षात फूट पडलेली नाही’, शरद पवारांच्या नव्या गुगलीने राजकीय चर्चांना उधाण (व्हिडीओ)

Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे आता नवीन नियम, काय-काय बदलले, जाणून घ्या

25 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या तीन राशीवाल्यांसाठी दिवस आहे खास, वाचा दैनिक भविष्य