Shark Tank India | ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासात प्रथमच घडली अशी घटना; स्पर्धकाने पैशांऐवजी शार्क्सकडे मागितली ‘हि’ गोष्ट

पोलीसनामा ऑनलाईन : Shark Tank India | ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. सध्या या कार्यक्रमाचा दुसरा सिझन सुरु आहे. हा सिझन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. पहिल्या सीझनपैकी भारतपे कंपनीचा फाउंडर अशनीर ग्रोव्हर या दुसऱ्या सीझनमध्ये नाही आहे तरीदेखील हा सिझन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. देशातील वेगवेगळ्या उद्योजकांच्या भन्नाट बिझनेसमध्ये कार्यक्रमातील शार्क्स हे भरभरून गुंतवणूक करत आहेत. (Shark Tank India)

आतापर्यंत या शार्क्सनी मिळून दुसऱ्या सीझनच्या 5 व्या आठडव्यापर्यंत 42.93 कोटी रुपये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत. येत्या काही भागांमध्ये हे शार्क्स आणखी बरीच गुंतवणूक करतील अशी अपेक्षा आहे. मात्र या शो दरम्यान अशी एक घटना घडली आहे यामध्ये एका स्पर्धकाने शार्क्सकडे पैशांची नव्हे तर त्यांच्या वेळेची मागणी केली आणि त्याबदल्यात तो त्यांना स्वतःच्या कंपनीत भागीदारी द्यायला तयार झाला आहे. शार्क टँक इंडियाच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडत आहे.

या स्पर्धकाचे नाव गुरसौरभ सिंग असे आहे.
त्यांनी आपल्या रोजच्या सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका किटचा शोध लावला आहे,
आणि याच किटसाठी त्यांनी नुकतीच शार्क टँकच्या मंचावर हजेरी लावली आहे.
गुरसौरभ यांच्या या किटचं नाव आहे ध्रुव विद्युत आणि हे किट सायकलवर बसवल्याने तिचं एका इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतर होतं.
यादरम्यान गुरसौरभ सिंग यांनी आपल्या किटसाठी चक्क शार्क्सकडे पैसे न मागता त्यांचे 100 तास 0.5% इक्विटिसाठी मागितले आहेत. हे ऐकून सगळेच शार्क आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे आता नमिता, अनुपम, पियुष, विनीत आणि अमन यापैकी या प्रोजेक्टमध्ये कोण गुंतवणूक करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा कार्यक्रम तुम्ही सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टेलिव्हिजनवर पाहू शकता तसेच सोनी लाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहू शकता.

Web Title :-Shark Tank India | first time in the history of shark tank  india a pitcher did not ask for money from sharks