Shasan Aplya Dari | वेल्हे महसूल प्रशासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे 30 मे रोजी आयोजन

पुणे : Shasan Aplya Dari | वेल्हे (Velhe) महसूल प्रशासनाच्यावतीने वेल्हे, अंबवणे व विंझर मंडळातील गावांसाठी लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय, कोंढावळे खु येथे ३० मे रोजी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे (Shasan Aplya Dari) आयोजन करण्यात आले आहे.
तहसिल कार्यालयाअंतर्गत शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, सर्व प्रकारचे शासकीय प्रमाणपत्र देणे, नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी मंजूर पत्र वाटप व नवीन अर्ज स्वीकारणे, सलोखा योजना, लक्ष्मी मुक्ती योजना आदी सेवेचा लाभ देण्यात येणार आहे. (Shasan Aplya Dari)
नागरिकांना प्रधानमंत्री मातृवंदना योजना लाभ वाटप, कुटुंब कल्याण योजना प्रमाणपत्र वितरण, विवाह नोंदणी दाखला, मालमत्ता फेरफार व आकारणी पत्रक, जन्म मृत्यू प्रमाणत्र, रमाई घरकुल योजनांचे पत्र वितरण, बचत गट कर्ज प्रकरण मंजुरीपत्र वाटप, रक्त चाचणी, डोळ्याची चाचणी, आभा कार्ड आदी सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.
कृषि विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषि औजारे, बियाणे, औषधे, माती परीक्षण पत्र वाटप,
रानमोडी झुडूप निर्मूलन अभियान, महाडीबीटी पोटर्लवर नोंदणी आदी योजना व सेवांचा लाभ देण्यात येईल.
पाटबंधारे विभागाअंतर्गत पाणी मागणी अर्ज स्वीकरणे, पंप, मोटर परवाने मंजूर करणे, एकात्मिक बाल विकास विभागांर्गत भाग्यश्री योजना, पुरक पोषण आहार वाटप, कुपोषित बालकांची तपासणी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाअंतर्गत बस पास, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र सेवेचा लाभ देण्यात येणार येणार आहे.
उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागांतर्गत जमिनीची मोजणी, अ-शेतजमीन, ब-नगर भुमापन, ऑनलाईन प्रापर्टी कार्ड,
ऑनलाईन फेरफार आदी सेवांचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक वनीकरण, पशुवैद्यकीय विभाग,
दुय्यम निबंधक सहकारी संस्था, महावितरण, सामाजिक वनीकरण, वन विभाग आदी विभागातील योजनांचा
लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन
तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे.
Web Title : Shasan Aplya Dari | On behalf of the Velhe Revenue Administration, the campaign ‘Shasan Apya Dari’ was organized on 30th May
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात मैत्रीणीकडून ‘जीवलग’ मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या
Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?