Shashikant Ghorpade | बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह नीरा नदी पात्रात सापडला

शिरवळ : पोलीसनामा ऑनलाईन – पणन महासंचालक, पुणे सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (Shashikant Ghorpade ) हे बेपत्ता (Missing) झाले होते आहे. त्यांनी पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणा-या सारोळा पुलावरुन नीरा नदीमध्ये (Nira River) उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade ) हे शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोरुन बेपत्ता झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात (Shirwal Police Station) दाखल करण्यात आली होती. घोरपडे यांचा आज (शुक्रवार) सकाळी नीरा नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

घटनेच्या वेळी शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) हे आपले मिञ प्रदिप मोहिते (Pradip Mohite) यांच्या कारमधून पुणे कार्यालयातून गेले होते. नेहमी कार्यालयातून ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असत. माञ उशिरपर्यंत ते घरी न आल्याने तसेच त्यांचा मोबाइल बंद येत असल्याने त्यांच्या पत्नीने शशिकांत यांच्या बंधूंना याबाबतची माहिती दिली. यानंतर त्यांच्या बंधूनी कार्यालयात चौकशी केली असता शशिकांत हे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कार्यालयातून गेल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शशिकांत यांची सगळीकडे शोधाशोध सुरु केली. दरम्यान शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका कंपनीसमोर संबंधित कार लावून शशिकांत चहा पित असल्याचे दिसून आले.

यावेळी शोधाशोध केली असता शशिकांत घोरपडे यांचा ठावठिकाणा मिळू न शकल्याने श्रीकांत घोरपडे
(Shrikant Ghorpade) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल
करण्यात आली. याचदरम्यान, नीरा नदीच्या पात्रालगत सीसीटीव्हीमध्ये एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत
पूलाकडे जात असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने पुढे नदीमध्ये उडी मारल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे भोईराज
जलआपत्ती यांच्यामार्फत नीरा नदीपाञात शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.

Web Title :- Shashikant Ghorpade | panan joint director shashikant ghorpade body was found in the neera river pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Girish Mahajan | खडसेंना लाख वाटते, की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, पण…, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना टोला

Eknath Khadse | रश्मी शुक्ला फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट