Shehnaaz Gill | अभिनेत्री शहनाज गिल झाली नवरीच्या लेहेंग्यात तयार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही तिच्या क्युटनेसमुळे व फॅशनमुळे सर्वत्र ओळखली जाते. बिग बॉस 13 हिंदी (Bigg Boss 13) मधून घराघरात पोहचलेली शहनाज आज प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग असून तिच्या अपडेट जाणून घेण्यासाठी तिचा चाहता वर्ग उत्सुक असतो. शहनाजने (Shehnaaz Gill) अगदी शून्यातून तिचे हे विश्व निर्माण केले असून तिने अनेक बदल स्वतःमध्ये केले आहेत. ती तिचे नवनवीन फोटो (Shehnaaz Gill Photo) व प्रोजेक्ट इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे नुकतेच नवरी सारखे सजलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल ही सोशल मीडियावर खूप फेमस सेलिब्रिटी आहे. तिचे इंस्टाग्रामवर 15.4 मिलियन्स फॉलोवर्स असून शहनाजचा तगडा चाहता वर्ग आहे. शहनाजचा क्यूटनेस (Shehnaaz Gill Cuteness) व तिचा वेगळाच अंदाज य़ामुळे ती नेटकऱ्यांना खूप भावते. शहनाज देखील आपल्या फॅन्ससोबत व पापाराझींसोबत नम्रपणे वागताना दिसते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता तिने नवे नवरी सारखे फोटोशूट केले आहे. यामधील शहनाजचा देसी लूक (Shehnaaz Gill Desi Look) तिच्या चाहत्यांना फार आवडला आहे.

शहनाज गीलने (Shehnaaz Gill) तिच्या या फोटोशूटमध्ये लाल रंगांचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. यावर तिने नवरीप्रमाणे मेकअप केला असून मेंहेंदी देखील काढली आहे. त्याचबरोबर हेव्ही कुंदन ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे. हातामध्ये लाल चूडा घातलेली शहनाज तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले असून नेटकरी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट करत आहेत. शहनाज गील ही सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामध्ये झळकली होती. तिची व दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांची जोडी (Sidnaaz) सर्वांची आवडती जोडी होती.

 

Web Title :  Shehnaaz Gill | shehnaaz gill looks stunning in her bridal outfit actress shares mesmerizing video on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा