शिक्रापुरातील केबल कंपनीची 28 लाखांची फसवणूक ! बिजनेस मेनेजरसह 5 कंपन्यांवर FIR

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका केबल कंपनीमध्ये बिजनेस व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने बाहेरील राज्यातील कंपन्यांशी संगनमत करून कंपनीतील केबल माल देऊन कंपनीची तब्बल अठ्ठावीस लाखांची फसवणूक केल्याची घटना घडलीआहे आता याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बिजनेस मेनेजरसह बाहेर राज्यातील पाच कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथे अय्याज हमीराणी यांची फोरटीस केबल प्रायवेट लिमिटेड हि केबल कंपनी असून त्यांना सदर कंपनीच्या बाहेरील राज्यातील मालाची व्यवस्था करण्यासाठी नवज्योत निरमल सिंग याला बिजनेस व्यवस्थापक म्हणून नोकरीला ठेवले होते, त्यांनतर सिंग याने बाहेर राह्यातील पंजाब, हिमाचल प्रदेश यांसह आदी ठिकाणी असलेल्या कंपन्यांमध्ये लाखो रुपये किमतीच्या केबल दिल्या आणि काही ठिकाणच्या कंपन्यांचे पैसे देखील संबधित कंपनीला जमा केले, त्यांनतर सिंग याने पंजाब व हिमाचल प्रदेश येथील त्याचे ओळखीच्या व्यक्तींच्या नावे असलेल्या कंपनीला लाखो रुपयांचा माल पाठवून दिला, त्यानंतर सदर ठिकाणच्या मालाचे पैसे मागत असताना अचानकपणे नोकरी सोडून राजीनामा दिला त्यांनतर सिंग याने नोकरीला असलेल्या कंपनीशी विश्वास घात करून अठ्ठावीस लाख रुपये किमतीच्या केबल मालाचा अपहार केला असल्याचे समोर आले. याबाबत अय्याज कासम हमीराणी रा. पंचशील टावर खराडी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नवज्योत निरमल सिंग रा. जगजीत नगर लुधियाना पंजाब याच्यासह डी. एन. ट्रेडिंग कंपनी लुधियाना पंजाब, कांगरा इलेक्ट्रिक कंपनी वैजनाथ कांगरा हिमाचल प्रदेश, निजान इलेक्ट्रिक कंपनीबर्नाला पंजाब, युनायटेड मार्केटिंग कंपनी पंजाब, धामेरा ट्रेडिंग कंपनी लुधियाना पंजाब या पाच कंपन्यांना विरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.