Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Shikshak-Padvidhar Election | विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या नव्याने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी १० जून रोजी आयोगाने ही निवडणूक जाहीर केली होती, परंतु विविध शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्याने तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघ अशा ४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. नव्या कार्यक्रमानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होईल. (Vidhan Parishad)

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.
मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे.(Shikshak-Padvidhar Election)

तर, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांची मुदत संपत आहे.
त्यामुळे या ४ जागांसाठी निवडणूक आयोगाने या विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

असा आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुक कार्यक्रम

  • ३१ मे ७ जून पर्यंत अर्ज भरणार
  • १० जून रोजी अर्जाची छाननी
  • १२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
  • २६ जून रोजी मतदान होणार
  • १ जुलै रोजी होणार मतमोजणी

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचा कथित व्हिडीओ व्हायरल, आई शिवानी अगरवाल यांनी समाजमाध्यमांसमोर येऊन दिले स्पष्टीकरण (Video)

CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : आतापर्यंतच्या कारवाईची पोलीस आयुक्तांनी दिली माहिती, गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, चौकशीत समोर आले

Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातात बिल्डर विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचा नवा दावा, ”अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता”