Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी संदर्भात माध्यमांत बदनामीकारक बातम्या, हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिनं मीडियाकडून आपल्या विषयी चुकीच्या व बदनामीकारक बातम्या प्रसिद्द केल्या जात असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ‘कॅपिटल टीव्ही’नं (Capital TV) प्रसिद्ध केलेले आक्षेपार्ह व्हिडिओ व काही यूट्यूबरनी (YouTuber) केलेले आक्षपार्ह विधानं वेबसाईटवरुन काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. परंतु प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाबाबत (media coverage) सरसकट कोणताही अंतरिम आदेश न्यायालयाने दिला नाही.

पॉर्न फिल्म प्रकरणात (Porn movie Case) सध्या कोठडीत असलेले राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्याशी संबंधात अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. सोशल मीडियातही त्यावर चर्चा होत आहे. राज कुंद्रा याची पत्नी असल्यालने शिल्पा शेट्टी हिच्याही नावाची चर्चा आहे. राज कुंद्रा प्रकरणात शिल्पाच्या सहभागाविषयी देखील काही माध्यमांनी संशय व्यक्त केला होता. यावर संताप व्यक्त करत शिल्पाने याचिका दाखल केली होती. राज कुंद्रा याचा सहभाग असलेल्या पॉर्न फिल्म प्रकरणाचे वार्तांकन करताना तथ्यहीन बातम्या देऊन आपली प्रतिमा मलिन केली जात आहे. त्याविषयीच्या वर्तांकनाला मनाई करावी आणि संबंधित माध्यमांना भरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती शिल्पाने याचिकेत केली होती. याप्रकरणी आज न्यायमूर्ती गौतम पटेल (Justice Gautam Patel) यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली.

शिल्पा शेट्टीच्या वकिलांचा युक्तिवाद

शिल्पा शेट्टीच्या वतीने अ‍ॅड. बिरेंद्र सराफ (Adv. Birendra Saraf) यांनी बाजू मांडली.
राज कुंद्रा प्रकरणात काही माध्यमांचे वार्तांकन वस्तुस्थितीला धरुन नाही.
त्यात अनावश्यक मतं मांडून शिल्पा शेट्टी यांच्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काहींनी तर शिल्पा यांचं मातृत्व आणि लहान मुलांच्या पालन पोषणाविषयीही प्रश्न उपस्थित केले आहेत, याकडे सराफ यांनी न्यायालयाचे लक्ष वेधलं.

 

व्हिडिओ प्रथमदर्शनी बदनामीकारक

यावर कॅपिटल टिव्ही आणि फिल्म विंडोच्या हीना कुमावत (Heena Kumawat) यांनी प्रसिद्ध केलेले व्हिडिओ प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचे निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं व संबंधितांना निर्देश दिले.
हीना कुमावत यांनी शिल्पा शेट्टी विषयी केलेल्या विधानांचा व्हिडिओ इंटरनेटवरुन काढून टाकण्यात आला आहे.
तसेच यापुढे तो अपलोड करणार नसल्याची हमी कुमावत यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

20 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी

शिल्पा शेट्टी हिनं दाखल केलेल्या याचिकेतील मुद्यांविषयी सर्व प्रतिवादींनी 18 ऑगस्ट पर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करावं.
त्यावर शिल्ला शेट्टीनं 26 ऑगस्ट पर्यंत प्रत्युत्तर दाखल करावं, असे निर्देश न्या. गौतम पटेल यांनी दिले.
पुढील सुनावणी 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

Web Title : Shilpa Shetty | bombay high court on shilpa shettys defamation suit against 29 media houses

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीचा नवा लुक सोशल मीडियावर Viral, कॅप्टन कूलची ही स्टाईल चाहत्यांना सुद्धा खुप आवडली

Pollution Certificate बाबत निष्काळजीपणा पडू शकतो महागात, ‘RC’ होईल सस्पेंड, जाणून घ्या मोदी सरकार काय करणार

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना ED प्रकरणात जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार