Shiv Bhojan Thali Audit | शिंदे फडणीस सरकारच्या रडारवर शिव भोजन थाळी, होणार लेखापरीक्षण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – Shiv Bhojan Thali Audit | महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) महत्वाची योजना मानल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali Audit) या योजनेची लेखापरीक्षण आता एकनाथ शिंदे सरकार करणार आहे. या लेखापरीक्षणासाठी सरकारने यशदा (YASHADA) आणि टिस (TISS) या दोन संस्थांकडे गेली आहे. या लेखापरीक्षणांमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे. लोकांना या योजनेचा किती लाभ झाला? यामध्ये आणखी काही सुधारणा करता येतील का? योजना पारदर्शक आहे का? यासारखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणारा आहे.

शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali Audit) योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde- fadanvis Govt) घेतला जात आहे. त्यामुळे ते ही योजना बंद करण्याच्या विचारात होते. पण सरकारवर टीका झाल्यानंतर सरकारने योजना बंद करण्याचा विचार थांबवला आणि सध्यातरी ही योजना बंद होणार नाही. मात्र या योजनेत काही बदल केले जाणार आहेत. जसे की जर एखाद्या शिवभोजन थाळी केंद्रासंदर्भात तक्रारी असतील तर ते केंद्र चालू ठेवायचं की बंद करायचे, यावरही विचार होईल.

शिव भोजन थाळी योजनेबद्दल संपूर्ण राज्यातून ही माहिती गोळा झाल्यानंतर आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackarey) यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण मिळते. कोरोनामध्ये या थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली होती. या योजनेमुळे अनेकांना स्वस्त दारात जेवण मिळाले. सध्या राज्यात एक लाख ८८ हजार ४६३ थाळ्यांची विक्री होते.

Web Title :-  Shiv Bhojan Thali Audit | Shiv Bhojan Thali on Shinde Fadnavis government’s radar, will be audited

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची कंट्रोल रूममध्ये बदली; जाणून घ्या प्रकरण

Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंनी धरलं उध्दव ठाकरेंनाच जबाबदार, म्हणाले – ‘प्रकल्प त्यांच्यामुळेच…’

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं