‘अमर’ होण्यासाठी रावणाने ‘या’ शिव मंदिरातून बनवली होती स्वर्गाची ‘शिडी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – २१ फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाईल. या महाशिवरात्रीनिमित्त आम्ही तुम्हाला भगवान शिवशंकरांशी संबंधित असलेल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याशी काही मनोरंजक प्रसंग जोडलेले आहेत. आज आपण बोलणार आहोत पौडीवालाच्या शिवकालीन मंदिराबद्दल, या मंदिराबाबत असा समज आहे की रावणाने अमरत्व मिळवण्यासाठी येथे दुसरी पौड़ी बनविली. हे ठिकाण चंदीगडपासून ७० किलोमीटर दूर आहे तर नाहन पासून ६ किलोमीटरच्या अंतरावर आहे.

या शिव मंदिराचा इतिहास लंकापती रावणाशी जोडला गेल्याचे दिसून येतो. असे मानले जाते की रावणाने अमरत्व प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव शंकरांनी त्यांना एक वरदान दिलं की जर त्यांनी एका दिवसात पाच पौडी केल्या तर तो अमर होईल.

वरदान मिळाल्यानंतर रावणाने हरिद्वारमध्ये पहिली पौडी बांधली, ज्याला आता हर ची पौडी म्हटले जाते. रावण ने दुसरी पौडीवाला मध्ये, तिसरी चुडेश्वर महादेव आणि चौथी किन्नर कैलासमध्ये बनवली. यानंतर रावणाला झोप आली. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. त्यानंतर रावणाची अमरत्वाची इच्छा त्याच्या मनातच राहिली.

असे मानले जाते की पौडीवाला येथे असलेल्या या शिवलिंगात साक्षात शिवशंकर वास करतात आणि येथे येणार्‍या सर्व भाविकांची प्रत्येक इच्छा येथे पूर्ण होते.

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, भगवान विष्णूंची तपश्चर्या केल्याने मृकंड ऋषीला त्यांनी पुत्राचे वरदान दिले आणि सांगितले की त्याचे वय फक्त १२ वर्ष असणार. या वरदानामुळे मार्कंडेय ऋषी जन्माला आले ज्यांनी अमरत्व मिळवण्यासाठी भगवान शिव यांच्या तपश्चर्या करत सतत महामृत्युंजय मंत्राचा जाप केला.

१२ वर्ष पूर्ण झाल्यावर जेव्हा यमराज त्यांना घ्यायला आले तेव्हा येथील स्थित शिवलिंगास त्यांनी कवटाळून घेतले ज्यामुळे भगवान शिव शंकर तेथे प्रकटले. शिव शंकरांनी त्यांना अमरत्वाचे वरदान दिले. तेथूनच मार्कंडा नदीचा जन्म झाला. यांनतर भगवान शिव शंकर पौडीवाला स्थित शिवलिंगात विलीन झाले.