पूर्व हवेलीत शिवजयंती उत्साहात साजरी

थेऊर :  पोलीसनामा ऑनलाइन –   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्व हवेलीत मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. लोणीकाळभोर,थेऊर,कुंजीरवाडी,आंळदी (म्हातोबा), कोलवडी साष्टे या ठिकाणी मोठ्या शिव छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सकाळपासूनच बालगोपालांनी शिवाजी महाराजांच्या फोटो असलेले भगवे झेंडे हातात, सायकलीवर लावून गावात फेरी घालतांना दिसत होती.

थेऊर येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या सरपंच शितल काकडे यांनी छत्रपतीच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपसरपंच आप्पासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,राहुल कांबळे,युवराज काकडे,संतोष काकडे गणेश गावडे,संजय काकडे,शशिकला कुंजीर,गौतमी कांबळे,रुपाली रसाळ, उपस्थित होते तसेच पै. आबा काळे युवा मंचच्या वतीने भव्य शिवजयंतीचे आयोजन केले होते यावेळी ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करण्यात आली छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,माजी पंचायत सदस्य हिरामण काकडे,माजी उपसरपंच दत्ताञय कुंजीर, मुंबई महापौर केसरी आबा काळे,आरपीआयचे हवेली प्रमुख मारुती कांबळे, मोरेश्वर काळे,सुखराज कुजीर, शहाजी जाधव,सुरेश चव्हाण, दलित महासंघाचे अध्यक्ष आंनद वैराट,केजी फाऊंडेशनचे अध्यक्ष खंडू गावडे उपस्थित होते.

नरवीर उमाजी नाईक सभागृहात छञपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन संजय गावडे यांनी करुन पुष्पहार अर्पण केला यावेळी चिंतामणी सहासिटर संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते थेऊर बसस्टाॕप चौक मिञ मंडळाने छञपती शिवरायांच्या पुतळ्यास रामचंद्र बोडके यांनी पुष्पहार अर्पण करुन विधिवत पुजा केली.

कुंजीरवाडी येथिल ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अंजू गायकवाड यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते अखिल कुंजीरवाडी मिञमंडाळाच्या वतीने शिवाजी महाराजांची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तर कोलवडी येथे शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी कोलवडीच्या सरपंच सुरेखा गायकवाड यांनी रक्तदान केले यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य व शिवभक्तानी शिवजयंती निमित्ताने रक्तदान केले सर्वच गावामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे गावातील वाड्या वस्तीवर जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालय शाळांमध्ये देखील महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.