Shivaji Nagar Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी, 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Nagar Pune Crime | इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून घेऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तसेच मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तरुणीच्या नकळत व्हिडीओ (Nude Video) तयार केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा (Demand Of Extortion) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत पुण्यातील वेगवेगळ्या हॉटेल घडला आहे.(Shivaji Nagar Pune Crime)

याबाबत 34 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 23) फिर्याद दिली आहे. त्यानुसार केतन महादेव चौघुले Ketan Mahadev Chowghule (वय-33 रा. मु.पो. कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर) व त्याचा मित्र शेखर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 376, 376(ड), 385, 504, 506, 34 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी केतन चौघुले याला पुण्यातून अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने (PI Anil Mane) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नोकरी करते. तर आरोपी केतन काहीच कामधंदा करत नाही. आरोपी केतन आणि फिर्य़ाद यांची डिसेंबर 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेला मेसेज व कॉल करुन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर फिर्य़ादी यांना पुण्यातील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले.
त्याठिकाणी आरोपीने त्याचा मित्र शेखर याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास तरुणीला भाग पाडले.
त्यावेळी आरोपीने संबंध ठेवतानाचा व्हिडीओ फिर्यादी यांच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये काढला.
केतन याने पीडित तरुणीला फोन करुन त्याने काढलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख
रुपये मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला.

तुझे अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन तुझी बदनामी करेन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.
केतन याने फिर्यादीकडे जाऊन पैशांची मागणी केली.
तसेच पुण्यातील हॉटेलमध्ये मित्रासोबत संबंध ठेवतानाचा काढलेला अश्लील व्हिडीओ फिर्य़ादी यांच्या कार्य़ालयात
काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर पाठवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडितेने तक्रार देताच शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी केतन चौघुले याला बेड्या ठोकल्या आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio | डाटा वापरात चायना मोबाईलला मागे टाकून रिलायन्स जिओ बनला जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर

Devachi Uruli Garbage Depot | देवाची उरुळी कचरा डेपोतील लॅन्डफिलिंग व रामटेकडी प्रक्रिया प्रकल्पात ‘गोलमाल’ प्रकरणाची चौकशी करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.