Shivsena MP Sanjay Raut | राऊतांच्या घरात सापडली डायरी, कोट्यावधींचा हिशोब कोडिंगमध्ये, राऊतांच्या अडचणीत वाढ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा Prevention of Money Laundering Act (PMLA) न्यायालयाने संजय राऊतांच्या ईडी कोठडीत (ED Custody) 8 ऑगस्ट पर्यंतची वाढ केली आहे. तर ईडीने राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) समन्स पाठवलं आहे. त्यानंतर आता ईडीला राऊतांच्या (Shivsena MP Sanjay Raut) घरातून जप्त केलेल्या एका डायरीमध्ये (Diary) काही कोडवर्ड्सच्या नोंदी (Codewords) आढळल्या आहेत. हे कोडवर्ड म्हणजे ज्या लोकांना पैसे दिले त्यांची नावं असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यामुळे आता राऊतांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

 

संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्याविरोधातील पुरावे त्यांच्याच घरातून सापडले, असा दावा ईडीने कोर्टात केला. संजय राऊतांच्या घरातून एक डायरी ईडी अधिकाऱ्यांना मिळाली. ही डायरी राऊतांच्या रुममध्ये होती. या डायरीत कोडवर्डमध्ये 1 कोटी17 लाख रुपये पैसे दिले गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. हे लोक कोण आहेत, एवढी मोठी रक्कम कुणाला दिली याबाबत संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे ईडीने आजच्या रिमांडमध्ये सुद्धा 1 कोटी 17 लाख रुपये मिळवण्याचा उल्लेख डिमांड रिपोर्टमध्ये केला होता.

डायरी खूप महत्त्वाची आहे. पैसे पत्राचाळ घोटाळ्यातून मिळाले होते ते पैसे कॅशच्या स्वरूपात देण्यात आले.
ते पैसे राऊत यांच्या जवळच्या व्यक्तींना नावावर देण्यात आले.
त्यांची नावे कुणाला कळू नये यासाठी ते कोडींग भाषेत (Coding Language) लिहिण्यात आले,
असा ईडीला संशय आहे. ईडीने हे कागदपत्रे जप्त केली आहेत. त्या डायरीच्या मध्यमातून ईडी संबंधित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
या 1 कोटी17 लाख व्यतिरिक्त आणखी 3 कोटी रुपये कॅशचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
त्याप्रकरणी देखील ईडी तपास करत असल्याची माहिती ईडीने दिली.

 

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | ed get dairy from sanjay raut house claim that some documents written about cash in codding language

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Patra Chawl Scam | संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने पाठवले समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

 

Pune Pimpri Crime | दारुचा ग्लास सांडला म्हणून मित्राचा खून, मृतदेह फेकला कचऱ्यात; हिंजवडी पोलिसांकडून दोघांना अटक

 

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; शहा, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता