प्रभास आणि सैफनं सुरू केली ‘आदिपुरुष’ची शुटींग ! पोस्टर शेअर करत केली घोषणा

पोलिसनामा ऑनलाईन – बाहुबली (Baahubali) फेम प्रभास (Prabhas) गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुष (Adipurush) या आगामी सिनेमामुळं चर्चेत आहे. अलीकडेच सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. खास बात अशी की, या सिनेमा सैफ अली खानही दिसणार आहे. नुकतीच याची शुटींग सुरू झाल्याचं प्रभासनं सांगितलं आहे. त्यानं सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं आहे.

प्रभासनं त्याच्या इंस्टावरून सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्ट शेअर करताना त्यानं लिहिलं की, वाईटावर चांगल्याच्या विजय साजरा करत आहोत. पोस्टरवर आरंभ असंही लिहिलं आहे. याचा अर्थ असा की, आता शुटींग सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये त्यानं भूषण कुमार आणि सैफ अली खान यांनाही टॅग केलं आहे.

प्रभासची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर अनेकांनी अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही पोस्ट शेअर देखील केली आहे.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजी फेम ओम राऊतच्या आदिपुरुष या आगामी सिनेमात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. क्रिती सेनन यात सीतेची भूमिका साकारणार आहे. केजीएफचे डायरेक्टर प्रशांत नील यांच्या सलार या सिनेमतही प्रभास प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.