Shrimant Bhausaheb Rangari Ganpati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे गणेश जयंती उत्साहात

भजन सेवा, महाआरती आणि पालखी सोहळ्याचे आयोजन

पुणे : Shrimant Bhausaheb Rangari Ganpati : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी भजन सेवा, महाआरती आणि जंगी पालखी सोहळ्याचा उत्साह पहायला मिळाला. त्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रमही यावेळी उत्साहात पार पडले.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti 2024) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर स. ९ च्या सुमारास ‘गणेश याग’ करण्यात आला.

‘गणेश याग’ संपन्न झाल्यावर दु. १२ च्या सुमारास ले. जनरल. डी. बी. शेकटकर (D. B. Shekatkar) यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात आली. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भजन सेवा कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ही भजन सेवा संपन्न झाली.

सायंकाळी पाचच्या सुमारास बी.व्ही.आय. पुणे यांच्यातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट परिसरात अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास श्रींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर गिरनार शक्तीपिठाचे पिठाधीश प.पू. महंत महेशगिरी बापू महाराज (Mahesh Giri Bapu Maharaj) यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) उपस्थित होते.

दरम्यान, दिवसभर पुणे व परिसरातील असंख्य भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. रात्री ९ नंतर ‘शंकर महाराज भजनी मंडळ’ यांच्यावतीने भजन कार्यक्रम संपन्न झाला.